Tuesday, March 25, 2025
Homeजळगावपुष्पवृष्टी, रांगोळ्या, विद्युत रोषणाईने मंगेश चव्हाण यांचे मतदार संघात स्वागत

पुष्पवृष्टी, रांगोळ्या, विद्युत रोषणाईने मंगेश चव्हाण यांचे मतदार संघात स्वागत

चाळीसगाव । प्रतिनिधी chalisgaon

आमदार मंगेश चव्हाण यांचे प्रचारादरम्यान शहरासह तालुक्यातील गावोगावी जंगी स्वागत होताना दिसत आहे. कुठे गल्लीमध्ये पुष्पवृष्टी, कुठे मोठ मोठ्या रांगोळी सडा, तर कुठे फुलांचे सुशोभीकरण, फुलांचे डेकोरेशन, तर काही ठिकाणी विद्युत रोषणाई आशा पद्धतीने चाळीसगावातून आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारास उत्स्फूर्त प्रतिसाद तालुक्यातून लाभत आहे. या अनपेक्षित मिळणार्‍या प्रेमामुळे आमदार मंगेश चव्हाण व सौ प्रतिभाताई चव्हाण देखील भारावून गेल्या आहेत.

- Advertisement -

एखाद्या साधुसंताचे स्वागत करावे तसे स्वागत उत्स्फूर्तपणे जनतेकडून आमदार मंगेश चव्हाण व सौ.प्रतिभाताई चव्हाण यांचं होत आहे. व या भव्य दिव्य स्वागताची चर्चा संपूर्ण तालुक्यासह जिल्हाभरात सोशल माध्यमातून जोरदार व्हायरल होतना दिसत आहे. चाळीसगावात शहरासह तालुक्यात विकास कामांमुळे चेहरा मोहरा बदलला असला तरी विकास कामे जनतेपर्यंत पोहोचली आहे व जनतेच्या जिव्हाची असल्याने लहानपणापासून ते थोरांपर्यंत या कामांची चर्चा परापारावर दिसून येत आहे.

आमदार मंगेश चव्हाण हे सर्वसामान्य जनतेबरोबरच तालुक्यातील युवा वर्गाचा देखील गळ्यातील ताईत बनले आहे. व तरुणाईला हवे असल्यास बदल आमदार मंगेश चव्हाण यांनी विकास कामांच्या माध्यमातून घडवून आणले आहे त्यामुळे जिथे जातील तिथे तरुणांची भाजपा प्रवेशासाठी तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ज्यांचा राजकीय पक्षाशी संबंध नाही अशा तरुणांची संख्या सर्वाधिक असून इतर राजकीय पक्षांचे देखील तरूण कार्यकर्त्यांनी आता आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे तरुणाईची मोठी फौज आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्यासाठी मैदानात उतरली असल्याने त्यांची विजयाची वाट सुकर झाली असल्याचे दिसून येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...