Saturday, May 18, 2024
Homeदेश विदेशRajasthan : राजस्थानमध्ये मणिपूर सारखे कृत्य! महिलेला विवस्त्र करून धिंड काढली

Rajasthan : राजस्थानमध्ये मणिपूर सारखे कृत्य! महिलेला विवस्त्र करून धिंड काढली

प्रतापगड | Pratapgarh

गेल्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशाल हादरवणारा व्हिडिओ मणिपूर मधून समोर आल्याचे पाहायला मिळाले होते. दोन महिलांना नग्न करून धिंड काढण्यात आल्याची ती घटना होती. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. मात्र आता एका आदिवासी महिलेला तिच्या पतीने गावकऱ्यासमोर विवस्त्र केल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानमध्ये घडला आहे.

- Advertisement -

प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे. 31 ऑगस्ट रोजी एका महिलेला तिच्या पतीने विवस्त्र करून संपूर्ण गावात फिरवले. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पोलिसांनी पीडितेच्या नराधम पतीसह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देऊन दोषींवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड तालुक्यातील पहाडा गावात ही घटना घडली. पीडितेचे एक वर्षापूर्वी आरोपीसोबत लग्न झाले होते. लग्नाआधी पीडितेचे त्याच्या गावी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. धक्कादायक म्हणजे ती चार दिवसांपूर्वी तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. ही बाब तिच्या सासरच्या मंडळींना समजतात, त्यांनी तिला घरी आणले. त्यानंतर तिला शिक्षा देण्यासाठी विवस्त्र केले. नंतर तिला बेदम मारहाण करत तिची गावातून विवस्त्र अवस्थेत धिंड काढली.

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिस अधीक्षक अमित कुमार रात्री उशिरा गावात पोहोचले होते. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्याचवेळी बांसवाडा रेंजच्या पोलीस महानिरीक्षकांही या प्रकरणाची दखल घेत आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना अत्यंत लाजिरवाणी असल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. ‘सुसंस्कृत समाजात अशा गुन्हेगारांना स्थान नाही. या गुन्हेगारांना लवकरात लवकर तुरुंगात टाकले जाईल, आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल,’ असे ट्वीट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या