Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशमणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला; पोलिसाची निर्घृण हत्या, सुरक्षा दलाची शस्रास्रे पळवली

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला; पोलिसाची निर्घृण हत्या, सुरक्षा दलाची शस्रास्रे पळवली

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

मणिपूरमध्ये (Manipur) गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार (Manipur Clashes) सुरु आहे. हा हिंसाचार थांबायचे नाव घेत नाहीये. मणिपूरमध्ये वारंवार जाळपोळ, हल्ला, दगडफेक यासारख्या घटना घडताना दिसत आहेत. अशामध्ये मणिपूरमध्ये गुरुवारी पुन्हा हिंसाचाराची (violance) घटना घडली.

- Advertisement -

अशाच एका प्रकारात मणिपूरमध्ये जमावाने भारतीय राखीव दलाच्या तुकडीची शस्रास्रे लुटली आहे. तर इम्फाळ पश्चिममध्ये उसळलेल्या हिंसाचारात एका पोलिसाचा मृत्यू झाला. जमावाने गुरुवारी बिष्णुपूर जिल्ह्यात दोन पोलीस चौक्यांची तोडफोड केली. त्यानंतर हा जमाव स्वयंचलित बंदुकांसह शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन पळून गेले.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाच्या बिकट अवस्थेवर मनसेचे खोचक ट्विट ; म्हणाले…

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ५०० जणांच्या जमावाने भारतीय राखीव बटालीयनच्या स्टेशनवर हल्ला केला. या जमावातील बरेच लोक लहान वाहनातून आले होते. या जमावाने स्टेशनवर हल्ला करुन विविध प्रकारच्या रायफल्स, पिस्तुल, काडतुसे, अश्रुधूर आदी लुटण्यात आले.

दरम्यान, मणिपूरच्या कौत्रुक, हरोथेल आणि सेंजम चिरांग भागात सशस्त्र हल्लेखोर आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात एका पोलिसासह दोन जण जखमी झाले आहेत. इम्फाळ पश्चिम येथील सेंजम चिरांग येथे ही घटना घडली. डोक्यात गोळी लागल्याने मणिपूर पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. या गोळीबारामध्ये एक जण जखमी झाला आहे.

बारसू आंदोलन, वारकऱ्यांवर लाठीचार्ज ते महापालिका निवडणुका; फडणवीसांनी विधानपरिषदेत सगळंच काढलं

तर, बिष्णुपूर आणि चुराचंदपूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या फुगाकचाओ इखाई येथे ४००-५०० लोकांचा मोठा जमाव जमला होता. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामध्ये २५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील परिस्थिती अजूनही अस्थिर आणि तणावपूर्ण राहिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या