मणिपूर | Manipur
लैमध्ये अपहरण झालेल्या दोन तरुणांच्या हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी मणिपूरमध्ये आंदोलनाचा पुन्हा भडका उडाला. आंदोलनकर्त्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच लाठीमारही केला. त्यात बहुतांश मुलींसह ४५ विद्यार्थी जखमी झाले.
मणिपूरमधील तणावामुळे मंगळवारपासून ५ दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. ही इंटरनेट सेवा १ ऑक्टोबर रविवारच्या रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान पाच महिन्यांआधीच राज्यात इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. याशिवाय राज्यातील सर्व शाळाही तीन दिवस बंद राहणार आहेत. राज्य सरकारने बुधवार आणि शुक्रवारीपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केलीय. प्रेषित मोहम्मद यांच्या जयंती ईद-ए-मिलादनिमित्त २८ सप्टेंबर रोजी राज्यात शासकीय सुट्टी असणार आहे.
Iraq Wedding Fire : लग्नसोहळ्यात अग्नी तांडव! वधू-वरासह वऱ्हाडी होरपळले, १०० जणांचा दुर्दैवी मृत्यू
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
फिजाम हेमजित (२०) आणि हिजाम लिनथोइनगांबी (१७) हे दोन तरुण सहा जुलैपासून बेपत्ता होते. या दोघांच्याही मृतदेहांची छायाचित्रे सोमवारी समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच मणिपूरमध्ये आंदोलनाचा भडका उडाला. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चे काढले. मुख्यमंत्री कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना सुरक्षा दलांनी रोखण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यात विद्यार्थी जखमी झाले. त्यांच्यावर वेगवेगळ्या इस्पितळांमध्ये उपचार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.