Saturday, September 14, 2024
Homeदेश विदेशमणिपुरात पुन्हा भडका! आक्रमक जमावाने शस्त्रागार फोडले; रायफल्स, काडतूसे घेऊन पोबारा

मणिपुरात पुन्हा भडका! आक्रमक जमावाने शस्त्रागार फोडले; रायफल्स, काडतूसे घेऊन पोबारा

इंफाळ । Imphal

मणिपूरमध्ये सुरु असलेला हिंसाहार थांबण्याचे नाव घेत नाहीये. यातच काल विष्णूपूर येथे काही समाजकंटकांनी पोलिसांच्या रायफल्स आमि काडतूसे पळवली. हा शस्त्रसाठा जमाव पळवून नेत असताना जवान आणि जमावात प्रचंड झटापट झाली. या हाणामारीत दोन डझनहून अधिक जवान जखमी झाले आहेत. या समाजकंटकांनी राज्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून जमावाला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. प्रचंड संख्येने येऊन जवानांवर हल्ला करून त्यांच्याकडील शस्त्रे पळवून नेण्यावर या जमावाचा भर असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात तणावाचं वातावरण पसरलं आहे.

- Advertisement -

VIDEO : सीमा हैदरला RPI (A) तिकीट देणार?; रामदास आठवले म्हणाले, “हो, आम्ही देणार, पण…”

जमावाने 235 असॉल्ट रायफल, 21 सब मशीन गन, 16 पिस्तूल आणि जवळपाल 9 हजार काडतुस असा दारुगोळा लुटला. कुकी झोमी जमातीच्या लोकांच्या सामुदायिक दफनविधीला मेईतेई समुदायाच्या लोकांनी विरोध केला होता. त्यावेळीही लष्कर, आरएएफच्या सैनिकांशी मणिपूरमधील निदर्शकांची चकमक झाली होती. यानंतर जमावाने राजधानी इंफाळ शहरातील शस्त्रागारे लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

राज्यात मागील 3 मे पासून हिंसाचार उसळला आहे. मेईतेई आणि कुकी समुदायातील या हिंसाचारात आतापर्यंत 150 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजारांपेक्षा आधिक लोक जखमी झाले आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे हिंसाचार रोखण्याचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. आता तर पोलिसांची शस्त्रागारे लुटण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे. या घटनांनी राज्यातील तणाव प्रचंड वाढला आहे.

धक्कादायक! चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने मुलीवर डान्स टीचरकडून अत्याचार

मणिपूरमधील परिस्थिती आधूनमधून हाताबाहेर जात आहे. जमावाकडून सतत जाळपोळ आणि हल्ल्यांच्या घटना घडतच आहेत. अनेक ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे तर काही ठिकाणी इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असे देखील आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या