Sunday, May 26, 2024
Homeदेश विदेशManipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा भडका! महिलांवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचं घर...

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा भडका! महिलांवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचं घर संतप्त जमावाने पेटवलं

दिल्ली । Delhi

मणिपूरमध्ये जमावाने महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढली, शरीराची विटंबना केली आणि सामूहिक अत्याचार केल्याचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. यानंतर या प्रकरणी हेरेम हेरोदास याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तो मुख्य आरोपी आहे. आरोपीचं नाव समोर आल्यानंतर संतप्त जमावानं त्याचं घर पेटवून दिलं आहे. त्यामुळं पुन्हा प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

- Advertisement -

कांगपोकपी जिल्ह्यातील एका गावात ३ मे रोजी उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर जमावानं दोन महिलांवर अत्याचार केले. त्यांची नग्न धिंड काढली आणि त्यांच्यावर अतोनात अत्याचार केले. १९ जुलै रोजी या भयंकर प्रकाराचे व्हिडिओ व्हायरल झाले. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकाराची गंभीर दखल घेत राज्य व केंद्र सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. दोन्ही सरकारवर टीकेची झोड उठली. तर, आधीच धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये संतापाचा भडका उडाला. ४ मे रोजी घडलेल्या घटनेची १८ मे रोजी तक्रार नोंदवण्यात आली. हे प्रकरण नॉन्गपोक सेकमाई पोलिस ठाण्यात वर्ग करण्यासाठी पोलिसांनी एक महिना आणि तीन दिवस लावले. २१ जून रोजी ही बाब नॉन्गपोक सेकमाई पोलिस स्टेशनच्या निदर्शनास आली. त्यानंतर रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला. सोशल मीडियावर आक्रोश झाल्यानंतर व्हिडिओत दिसलेल्या हेरेम हेरोदास या मुख्य आरोपीला गुरुवारी अटक झाली. त्याचं नाव समोर येताच संतप्त जमावानं काल त्याचं घर जाळून टाकलं आहे.

भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने टॅक्सीला उडवलं, ६ जणांचा जागीच मृत्यू… घटना CCTVत कैद

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची राष्ट्रीय महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) ने ट्विटर इंडियाच्या पब्लिक पॉलिसी प्रमुखांना संबंधित व्हिडीओ प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. दोन महिलांना नग्नावस्थेत धिंड काढणं ही लज्जास्पद बाब आहे. या व्हिडीओंमधून पीडित महिलांची ओळख सार्वजनिक होत आणि हा दंडनीय गुन्हा आहे, असं महिला आयोगाने आदेशात म्हटलं आहे.

आणखी ३ आरोपींना अटक

याप्रकरणी आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचे मणिपूर पोलिसांनी ट्वीट केले आहे. त्यानंतर याप्रकरणी एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत.

नमामी गंगे प्रकल्पाच्या साईटवर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट; १५ जणांचा मृत्यू, ७ जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या