Friday, May 3, 2024
Homeनगरदोन वेगवेगळ्या घटनात मांजामुळे दोघे जखमी

दोन वेगवेगळ्या घटनात मांजामुळे दोघे जखमी

अहमदनगर (प्रतिनिधी) –  नालबंदखुट येथील सय्यद हारुन जरीवाला हे माळीवाड्यातून दुचाकीवर जात असताना मांजा अचानक डोळ्यासमोर आल्याने डोळा वाचविण्याच्या झटापटीमध्ये मांजा डोळ्यांवरती लागून मोठ्या प्रमाणात इजा झाली. त्यातच ते गाडीवरून पडल्यामुळे खांदाही सरकला आहे. सध्या ते खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे.

गड-किल्ले संवर्धक ठाकूरदास परदेशी रस्त्याने जात असताना मांजामुळे त्यांचाही गळा कापला गेला. नायलॉन (चिनी) मांजावर बंदी घालून विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या मांजामुळे काहींना जीवही गमवावा लागला आहे. परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या