Tuesday, October 22, 2024
Homeनाशिकमनखेड परिसरात नरभक्षक बिबट्या जेरबंद

मनखेड परिसरात नरभक्षक बिबट्या जेरबंद

बिबट्याच्या हल्ल्यात एका इसमाचा झाला होता मृत्यू

ठाणगाव |वार्ताहर| Thangav

सुरगाणा (Surgana) तालुक्यातील मनखेड (Mankhed) परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या (Leopard) अखेर वन विभागाच्या (Forest Department) अथक प्रयत्नांनी पकडण्यात आला. दहा दिवसांपूर्वी या बिबट्याने हल्ला करून मनखेड येथील गोपाळ सखाराम वाघमारे यांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला होता. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

- Advertisement -

वन विभागाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ या बिबट्याला पकडण्यासाठी मोहिम सुरू केली. गेल्या १० ते १२ दिवसांपासून वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत गुंतले होते. अखेर, २१ ऑक्टोंबर २०२४ रोजी मनखेड येथील इंडिया जिओ टॉवरजवळ ठेवलेल्या पिंजऱ्यात बिबट्या फसला.

या मोहिमेत वन विभागाच्या (Forest Department) वनपरीक्षेत्र अधिकारी सुधीर कुंवर, तुषार भोये, जे.टी. चौधरी, सुशिला लोहार यांच्यासह पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोपान राखोडे आणि पोलीस पाटील रघुनाथ महाले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक ग्रामस्थांचा देखील या मोहिमेत मोलाचा सहभाग होता. नारायण कनोजे, सदू गायकवाड, निवृती भोये, भास्कर कामडी यांच्यासह अनेक ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

सदर बिबट्याला तात्काळ ताब्यात घेऊन नाशिक येथील वन्यजीव विभागाकडे हलवण्यात आले आहे. बिबट्या (Leopard) पकडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आता दिलासा निर्माण झाला असून वन विभागाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या