Sunday, April 27, 2025
Homeनाशिकमनमाडकरांचा भारनियमनास विरोध

मनमाडकरांचा भारनियमनास विरोध

मनमाड । प्रतिनिधी | Manmad

राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसल्याचा दावा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी केला असतांना दुसरीकडे मनमाड शहर (manmad city) परिसरात आज (दि. 20) पासून भारनियमन सुरू करण्यात आले असून सकाळी 2 तास व संध्याकाळी दीड तास भारनियमन केले जात जाणार आहे.

- Advertisement -

आधी अघोषित आणि आता अधिकृतपणे भारनियमन सुरू करण्यात आल्यामुळे दुकानदार, व्यापारी, शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. भारनियमन रद्द करण्याची मागणी सर्वथरातून केली जात आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून शहर परिसरात उष्णतेची लाट आली असून एप्रिल महिन्यात त्यात मोठी वाढ झाली आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे तापमानात (temperature) मोठी वाढ होऊन पारां 41 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरू लागला आहे.

कडक उन बाहेर पडू देत नसल्यामुळे सर्व घरात थांबत असून त्यांच्यासाठी पंखे (fan), कुलर (Cooler), एसी (AC) यांचाच आधार आहे. दररोज साडेतीन तास केल्या जाणार्‍या भारनियमनामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. सध्या मुस्लीम बंधू-भगिनीचे पवित्र रमजान महिन्याचे रोजे (उपवास) सुरू असून त्यांनाही भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे. भारनियमनाचा सर्वाधिक फटका झोपडपट्टी व पत्र्यांच्या घरात राहणार्‍या गोरगरीबांना बसत आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे बाहेर पडता येत नाही आणि उकाडा घरात बसू देत; नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे.

दरम्यान, उकाड्याने नागरिक हैराण झालेले असून विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील सुरु आहेत. शिवाय भारनियमनाचा फटका हॉस्पिटल, दवाखान्यांनाही बसतो. त्यांच्या एक्स-रे मशीनसह इतर यंत्रणा बंद पडतात. त्याचा परिणाम रुग्णांवर होतो. त्यामुळे भारनियमन लादू नये अन्यथा रिपाईतर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा रिपाइं युवक तालुकाध्यक्ष गुरूकुमार निकाळे यांनी दिला आहे.

याआधी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवर असताना दररोज तासन्तास भारनियमन केले जात होते. फडणवीस सरकार सत्तेवर आले असताना मात्र एक दिवस देखील भारनियमन करण्यात आले नव्हते. राज्यात पुन्हा आघाडी सरकार सत्तेवर येताच भारनियमन सुरु झाले, त्यामुळे इन्व्हर्टर बनविणार्‍या कंपन्यांसोबत यांची हातमिळवणी तर नाही ना?

– नितीन पांडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष

करोनामुळे दोन वर्षापासून व्यापारी, दुकानदार उद्ध्वस्त झाले आहेत. करोनाचे निर्बंध उठल्यामुळे आता काही दिवसांपासून विस्कटलेली घडी बसण्यास सुरुवात होत असतांनाच भारनियमनाचा फटका बसून पुन्हा व्यापारी व दुकानदार मेटाकुटीला येतील. त्यामुळे शासनाने तात्काळ भारनियमन बंद करावे.

– राजेंद्र पारीख, अध्यक्ष, व्यापारी महासंघ

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापाकडून मुलीची गोळ्या झाडून हत्या

0
चोपडा | प्रतिनिधी | Chopda जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) चोपडा शहरात (Chopda City) मुलीने प्रेमविवाह (Love Marriage) केल्याच्या रागातून सेवानिवृत्त सीआरपीएफ बापाने मुलीसह जावयावर गोळीबार...