Tuesday, April 29, 2025
Homeमुख्य बातम्याबांधकाम व्यावसायिक नरेश कारडांच्या भावाची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या

बांधकाम व्यावसायिक नरेश कारडांच्या भावाची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचे बंधू मनोहर कारडा यांनी आज अज्ञात रेल्वे गाडीखाली आत्महत्या केली असून या प्रकारामुळे नाशिकरोड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

तीनच दिवसापूर्वी त्यांचे मोठे भाऊ नरेश कारडा यांना मुंबई नाका पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. त्यानंतर त्यांना पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. या तक्रारीनंतर त्यांच्या विरोधात आणखी 15 तक्रार अर्ज आले. त्या अर्जामध्ये कारडा व त्यांच्या भावांचे नावे होती.

परिणामी कुटुंबियांचे मोठी बदनामी झाल्याने नरेश कारडा यांचे भाऊ मनोहर कारडा यांनी आज दुपारी अज्ञात रेल्वे गाडीखाली देवळाली कॅम्प जवळील बेलत गव्हाण येथे धावत्या रेल्वे गाडीखाली आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Congress News : संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसचे पंतप्रधान मोदींना पत्र

0
दिल्ली । Delhi जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...