Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजआता आरपारची लढाई होणार…; मनोज जरांगे पाटील यांनी दिला ईशारा

आता आरपारची लढाई होणार…; मनोज जरांगे पाटील यांनी दिला ईशारा

२९ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा

जालना | Jalana
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभुमीवर बैठक घेण्यात आली. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्येच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यानंतर राज्यात मोठा उद्रेक झाला अन् जरांगे पाटील हे नाव चर्चेत आहे. आज वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची जालन्यामध्ये बैठक झाली. ही बैठक संपता संपता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा करताच एकच खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?
“एका वर्षात आपल्याला काय मिळालं आणि काय मिळवायचं आहे. आपला एवढा मोठा बलाढ्य समाज असून का एक होत नाही हे काळजाला लागायचं. कुठेतरी वाटायचं समाजाला मायबाप म्हणून आपण काम केलं पाहिजे. २९ ऑगस्ट २०२३ ला क्रांती झाली शहागडच्या पैठण फाट्यावर उठाव झाला. मराठा एक होत नाही हे चॅलेंज होते नेमकी मराठा एक झाला, मराठा समाज एकजूट आहे हाच आयुष्याचा आनंद आहे,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

- Advertisement -

पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांच्यामुळचे मराठा आरक्षणाला खोडा बसल्याचा आरोप जरांगे यांनी केला. मंचावरुनच त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली. त्यामुळे कार्यकर्ते गोंधळले. त्यात महिलांनी आक्रोश सुरु झाला. जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण करु नये अशी त्यांना विनवणी करत होत्या तर काही महिलांना रडू कोसळल्याचे दिसले. त्याचवेळी जरांगे पाटील जागेवरुन उठले त्यांनी बैठक संपल्याचे जाहीर केले. अनेक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र फडणवीस मुद्दाम त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. आता आरपारची लढाई होणार असल्याचेही त्यांनी म्हंटले.

आता आरपारची लढाई
मनोज जरांगे यांनी यावेळी आरपारची लढाईचा इशारा दिला. उपोषणाने आरक्षण मिळवायचे आणि आमदारही पाडायचे असे आवाहन त्यांनी केले. काही झाले तरी आता देवेंद्र फडणवीस यांची जिरवणारच असा इशारा त्यांनी दिला. आपण समाजाला शब्द दिला आहे. कुणाचे कुटुंब उघड पडू देणार नाही. आता २९ सप्टेंबरापासून उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. विरोध करणारे भाजपचे आमदार पाडायचे म्हणजे पाडायचेच असे ते म्हणाले. सरकारकडे २९ सप्टेंबरपर्यंत वेळ असल्याचे त्यांनी जाहीर केले. एक वर्षात माझ्या समाजाचा तोटा झाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता आरपारची लढाईचा इशारा त्यांनी दिला.

देवेंद्र फडणवीसांवर टीका
देवेंद्र फडणवीसांवर जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस लय विचित्र प्राणी आहे. फडणवीस हे शेतकरी, गोरगरीबाला मारणारा प्राणी आहे.गावच्या गाव कुणबी नोंदी सापडल्या. आहेत. हे आंदोलन १०० टक्के यशस्वी झाल्याचे जरांगे म्हणाले. आपल्याला सरकारने दिलेलं आरक्षण मान्य नाही.देवेंद्र फडणवीस यांनी आपला तिहेरी तोटा केला आहे. दिवस बदलत असतात देवेंद्र फडणवीस, तुमचे दिवस बदलले का नाही मराठा समाजामुळं?जनतेवर अन्याय केल्यावर जनता ठेवत नसते असेही जरांगे पाटील म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...