Thursday, June 13, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Reservation : "त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्र घेऊन..."; मनोज जरांगेंचं उपमुख्यमंत्री...

Maratha Reservation : “त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्र घेऊन…”; मनोज जरांगेंचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना आवाहन

जालना | Jalna

- Advertisement -

जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंतरवाली सराटी गावामध्ये (Antarwali Sarati Village) गेल्या १४ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण (Hunger Strike) सुरु आहे. राज्य सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रालयात जरांगे पाटील यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. मात्र, अद्यापही त्यावर अंतिम तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत आपल्या मागण्याबाबत (Demands) कोणतेही ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. त्यातच त्यांनी कालपासून पाणी पिणे आणि औषधे घेणे देखील बंद केले असून सलाईनही काढले आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) विनंती करत आवाहन केले आहे. जालन्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना ते बोलत होते…

Cabinet Expansion : राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार?; भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट, कुणाला मिळणार संधी?

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “आमच्याविरोधात जे बोलतात त्यांना आम्ही सोडत नाही. आपला दणका असा आहे. त्यामुळे जो बोलत नाही त्याला का विनाकारण लक्ष्य करायचे, मग तो कोणी का असेना. मात्र, जे सत्तेत आहेत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरावा हा त्यांना आमचा संदेश आहे’, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “अजित पवार कमी पडलो असे म्हणाले होते. आता आम्ही त्यांना विनंती करतो, त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्र घेऊन आरक्षणाचा विषय लावून धरावा. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. गोरगरिबाचे कल्याण करावे. दुसरी आमची काहीही मागणी नाही. आमच्या गोरगरिबांचा आक्रोश (Outcry) त्यांच्या लक्षात येत असेल,’ असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केले आहे.

Weather Update : राज्यात पावसाची पुन्हा विश्रांती? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

ते पुढे म्हणाले की, “आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. विरोध म्हणून उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीला जाऊ नका, आमचा आक्रोश घेऊन या बैठकीला जा. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, तर तुमच्यासमोर नतमस्तक होईन. तुमच्यासमोर नाक घासायला मागे पुढे पाहणार नाही. अजित पवार यांनीच सर्व पक्षीय नेते गोळा करून गरिबांच्या लेकरांना न्याय द्यावा”, असेही मनोज जरांगे पाटील यांनी नमूद केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Thane band : मराठा आरक्षणाची धग कायम! आज ‘ठाणे बंद’ची हाक, शहरात चोख बंदोबस्त

- Advertisment -

ताज्या बातम्या