Monday, June 15, 2026
Homeमुख्य बातम्याManoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात; दरवाजा तोडून काढलं बाहेर

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात; दरवाजा तोडून काढलं बाहेर

मुबंई | Mumbai

मराठा आंदोलक आणि मराठा (Maratha) आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) हे लिफ्टच्या अपघातातून (Accident) थोडक्यात बचावले आहेत. बीड शहरातील एका रुग्णालयात हा अपघात घडला.शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील एका रुग्णाला भेटण्यासाठी रुग्ण असलेल्या मजल्यावर जात होते.

- Advertisement -

मात्र लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर (Land) आदळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झाली नसल्याचे समजते. तर लिफ्टचे (Lift) दरवाजे तोडून जरांगे पाटलांसह सहकाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे, अनेकांचा जीव भांड्यात पडला. तसेच या घटनेमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. पुन्हा एकदा मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये (Mumbai) धडकणार आहे. या आंदोलनाची तयारी सध्या सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून बैठकांचा धडाका सुरू आहे. मागील आंदोलनापेक्षा हे आंदोलन मोठे असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...