जालना | Jalana
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी इथे उपोषणा सुरुवात केली आहे. आज मध्यरात्रीपासून जरांगे पाटील यांनी उपोषणास सुरुवात केली असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी त्यांची आग्रही मागणी आहे.
आपल्या ताकतीवर आणि समाजावर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी केलेय. राजकीय भाषा बोलतात, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्यामुळे मला राजकीय स्टेटमेंट करायचे नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटलेय. काम न करणाऱ्याला लोक कसा फायदा होऊन देतील, तुम्ही फायदा केला तर उघड्या डोळ्याने समाज बघतो. आम्हाला राजकीय स्टेटमेंट करायचे नाही. आम्ही फडणवीस यांना संधी दिलीय. तुम्ही आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. आम्हाला दुसरे काहीही देणेघेणे नाही, असे मनोज जरांगेंनी म्हंटले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या औचित्यावर आपण १७ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून उपोषणास सुरुवात करणार आहोत, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार आज मध्यरात्रीपासून त्यांनी उपोषणास सुरुवात केली असून सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. “पुन्हा आमच्या नावाने बोंबलत बसायचे नाही. सरकारला आम्ही शेवटची संधी देत आहोत, जर आता मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर नंतर काहीही बोलून उपयोग नाही,” असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
सरकारला इशारा
कोणाला पाडायचे, कोणाला उभा करायचे तुम्ही फक्त सांगा असे समाज म्हणतोय. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचे नाही. मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले तर तुमचे बारा-तेरा वाजल्याशिवाय सोडणार नाही. मराठ्यांचे पोरं सोपे नाही. २०२४ ला तुमचा भुगा करणार, असा धमकीवजा इशाराच मनोज जरांगे यांनी दिलाय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा