Saturday, November 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange Patil: मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार;...

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार; म्हणाले, एका जातीच्या जोरावर…

जालना | Jalana
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून विधानसभा निवडणूक लढवण्यावर जरांगे यांच्याकडून चर्चा केली जात होती. मागच्या अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या निवडीसाठी खल सुरु होता. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. २८८ जागांवर निवडूक लढण्याची तयारी जरांगेंनी केली होती. कालपासून ते १३- १४ जागांवर लढणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलत होते.

म्हणून निवडणुकीतून माघार…
मनोज जरांगेंनी आज सकाळी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. “आम्ही रात्री साडेतीनपर्यंत चर्चेला बसलो होतो. आम्ही या निवडणुकीत मित्रपक्षांसोबत दलित आणि मुस्लीम उमेदवार उभे करणार होतो. कारण, एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. आम्ही राजकारणात नवखे आहोत. उमेदवार उभा करुन तो पडला तर जातीची लाज जाईल. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे माझी सगळ्या मराठा उमेदवारांना विनंती आहे की, सगळ्यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. निवडणूक हा काही आपला खानदानी धंदा नाही. एका जातीच्या जोरावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. एका जातीवर पुढे जाणे शक्य नाही, हे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे आपण निवडणूक लढायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. फक्त उमेदवार पाडायचे,” असे आमच्या बैठकीत ठरल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

पुढे मनोज जरांगे असे ही म्हणाले, आपलं आंदोलन सुरूच आहे, पुन्हा एकदा निवडणूक संपली की आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रात्री तीन तास चर्चा झाली. एकट्याने कसे लढायचे असे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, याला आणि पाड म्हणायची इच्छा नाही. लोकांना जे करायचे ते करा, कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडणून आणा असे सूचक वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले. आम्ही मतदारसंघ ठरवले होते. फक्त उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करणे बाकी होते. निवडणुकीतून माघार घेतली नसून याला तुम्ही गनिमी कावा म्हणू शकता असे जरांगे पाटील यांनी म्हटले. मित्रपक्षांनी यादी का दिली नाही ह्या प्रश्नावर मनोज जरांने यांनी उत्तर देणे टाळले.

यादी आली नसली तरी ते मित्रपक्ष आपलेच आहेत. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो कोणी आमच्या कामाचे नाही. त्यामुळे कोणाला पाडा आणि कोणाला आणा म्हणण्यात अर्थ नाही. तुमच्या मतदार संघात तुम्हाला ज्याला मदत करायची त्याच्याकडून ‘मी तुमच्या मागण्यांशी सहमत आहे’, असे लिहून घ्या, असे आवाहन केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या