Wednesday, May 22, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Reservation : " 'माझा आवाज चालू आहे, तोपर्यंत..."; मनोज जरांगे पाटलांचे...

Maratha Reservation : ” ‘माझा आवाज चालू आहे, तोपर्यंत…”; मनोज जरांगे पाटलांचे सरकारला आवाहन

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील (Jalna) आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणाला बसलेले आहेत. आज रविवार (दि.२९) रोजी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांनी सरकारला चर्चेसाठी दारं खुली केली आहेत.आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘दोन दिवस मी बोलू शकतो, त्यामुळे दोन दिवसात काय बोलायचं ते बोला’, असे म्हणत सरकारला चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले आहे…

- Advertisement -

Maharashtra News : सुप्रिया सुळे-जयंत पाटील घेणार राज्यपाल रमेश बैस यांची भेट; कारण काय?

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “सरकारला (Government) आरक्षण द्यायचं नसेल तर मराठ्यांचा सामना करावा लागेल. कुणाचातरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचे कल्याण होणार नाही. माझ्या हृदयाला काहीही होणार नाही. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडेल. मला काहीही झालं तरी मराठा समाज (Maratha) आंदोलन करणारच आहे. चर्चेला येऊ दिलं जात नाही असे कारण देत सरकार आरक्षण देणार नाही. त्यामुळे दोन दिवस चर्चेसाठी मी तयार आहे. त्यानंतर मला बोलता येणार नाही. माझी बोलती बंद झाल्यावर रट्टे खाण्यासाठी येणार का? तुमचे कोण मातब्बर आहेत, त्यांना घेऊन या. मराठा समाज तुम्हाला काहीच बोलणार नाही. उलट तुम्हाला संरक्षण देईल,असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण; खासदार प्रफुल्ल पटेल यांची माहिती

पुढे ते म्हणाले की, “गावातील लोकांच्या चुली पेटत नसून ते जेवणही करत नाही. तुम्ही पाणी आणि उपचार घ्या, अशी चिट्ठी लिहून मला संदेश देण्यात आला. मी कधीच या गादीला नाही म्हटलेलो नाही. परंतु गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केले आहे. मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतो आहे. गादीने मराठा समाजाच्या कल्याणासाठी कधीही माघार घेतलेली नाही. मीही समाजाच्या कल्याणासाठी माघार घेणार नाही. मी गादीचा शब्द कधीही खाली पडून दिला नाही. मात्र, माझा नाईलाज आहे. समाजाच्या कल्याणासाठी, समाजाला न्याय मिळावा म्हणून मला ही कठोर भूमिका घ्यावी लागत आहे. मराठ्यांची लेकरंबाळं फार तरसली आहेत. त्यामुळे गड्यांनो मला माफ करा”,अशी भावनाही मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध भारत लगावणार विजयी षटकार? कुणाचे पारडे जड?

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, “यात तुमचेच मराठ्यांची लेकरं आहेत. त्या लेकरांसाठी गड्यांनो मला माफ करा. मी पाणी उपचार घेऊ शकत नाही. कारण माझ्या लेकरांच्या काय वेदना आहेत या सरकारने ओळखल्या पाहिजेत. सरकारने यावर तातडीने निर्णय घेऊन मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावावा. समाजाने खूप वेदना सहन केल्या आहेत. मराठा जातीवर खूप अन्याय झाला आहे. आता अन्याय होऊ द्यायचा नाही. म्हणून ही लढाई आहे. इथे माझा हेकेखोरपणा नाही, आडमुठेपणाही नाही. माझ्या जातीवर अन्याय झाला आहे. मला थांबता येणार नाही,” असेही मनोज जरांगे पाटील यांनी नमूद केले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नांदगाव तालुक्यात मोठी कारवाई; देहव्रिक्री रॅकेटचा पर्दाफाश

- Advertisment -

ताज्या बातम्या