Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange Patil : गोपीनाथ मुंडेंचे  वारसदार पंकजा नाही तर मग कोण?

Manoj Jarange Patil : गोपीनाथ मुंडेंचे  वारसदार पंकजा नाही तर मग कोण?

मनोज जरांगेंचा मंत्री भुजबळ यांना सवाल

मुंबई | Mumbai

बीडमधील ओबीसी मेळाव्यात (Beed OBC Gathering) मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचे विधान केले होते. यावरून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या राजकीय वारसदारावरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की, वैचारिक मतभेद असू नयेत. देशात ठसा उमटवणार्‍या व्यक्तीबद्दल आपल्याला आत्मीयता असली पाहिजे. छगन भुजबळांनी (Chhagan Bhujabal) संस्कारहीन वागू नये. रक्ताने हात भरलेले लोक भुजबळांनी जमा केलेले आहेत. भुजबळ बीडला आले आणि भेद पसरवून गेले. मुंडे कुटूंबाला तुम्हाला हिणवायचं आहे का? असा सवाल त्यांनी छगन भुजबळ यांना विचारला.

तो मिळेल त्या संधीत त्या पोरीला चेंगरायचं बघतो, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडेंची बाजू घेत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. मुंडे घराण्यात दरी धनंजय मुंडेंनीच तयार केली आहे. आपल्या बापाला याच्यामुळे मान खाली घालून चालावं लागलं, हे खर्‍या वारसाला कळत नाही का? खरा वारसा त्याच्यासोबतच हिंडत फिरतो. मग आपल्या सारख्याने काय बोलावं? खर्‍या वारसाने असे लोक खड्यासारखे बाजूला करावेत. पंकजा मुंडेच (Pankaja Munde) गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार आहे हे म्हणण्याची गरज नाही. पंकजा मुंडे (Pankaja Munde) वारसदार नाही तर मग वारसदार कोण? असा सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. नुसती बहीण-बहीण म्हणून गळ्यात हात टाकून होत नाही. त्यांनीही तुम्हाला आपलं समजायला हवं, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad BJP List : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची...

0
मुंबई | Mumbai भारतीय जनता पक्षाकडून (BJP) राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांची (Candidate) घोषणा करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक आणि...