छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati SambhajiNagar
सरपंच संतोष देशमुख आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेले वाल्मिक कराडच्या अटकेमुळे अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी चर्चा केली. मुंडे यांना टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच भगवानगड त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी म्हटले आहे. यानंतर मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
संत महंत समाज घडवणारे एक न्याय मंदिर आहे. मात्र असे खरेच असेल तर आरोपींचे समर्थन, हे राज्याचे मोठे दुर्दैवी आहे. शेवटी महंत हे महंत असतात. या कृत्याला जर कोणी समर्थन देत असेल तर ते समर्थन हे गुंडगिरीला प्रोत्साहन देणारे ठरेल. ते असे बोलले असतील तर भयंकर आहे. यात राज्याची मोठी हानी आहे. खून केल्याचा आंनद आणि गुन्हेगार यांना सोडून द्या, असा त्याचा अर्थ होत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे-पाटील यांनी गुरूवारी उपोषण स्थगिती केले आहे. यानंतर त्यांच्यावर छत्रपती संभानगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तेव्हा ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
“मराठा, वंजारी, ओबीसी, धनगर किंवा कोणताही समाज असो; इतके विकृतपणाने केलेल्या कार्याला कुठलाही समाज पाठीशी घालत नाही. धनंजय मुंडे यांची टोळी यातून सोडून द्या. वंजारी समाजालाही अशा गोष्टी मान्य नाहीत. धनंजय मुंडेंच्या दबावाखाली महंत आहे का? असा प्रश्न विचारल्यावर जरांगे-पाटील म्हणाले, “महंत खूप खमक्या आहेत. ते स्पष्ट बोलतात. ते कुणालाही भीत नाहीत.” ते असे बोलले असतील तर दुरूस्ती करतील. कदाचित त्यांना एक बाजू सांगितली असेल म्हणून ते बोलले असतील. दरम्यान महंत नामदेवशास्त्री यांच्यावर दबाव असेल असा मला विश्वास बसत नाही. मात्र ते असे बोलले असतील तर हे भयंकर आहे. यात राज्याची मोठी हानी आहे. खून केल्याचा आंनद आणि गुन्हेगार यांना सोडून द्या, असा त्याचा अर्थ होतो असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
रक्ताची माया दया नाही का?
या प्रकरणात माणसाला मारून टाकले, त्याच्या रक्ताची माया दया नाही का? तुमच्यावर फाशीची वेळ आली म्हणून बाबाजी यांचा आसरा घेण्यासाठी गेले. पूर्वी दुःख देणारे हेच का मग, हीच का ती टोळी. बाबाजी यांना तुम्ही यात ओढत आहात. किंबहुना धनंजय मुंडे वातावरण दूषित करत आहेत. हा धक्कादायक विषय आहे. न्यायची अपेक्षा न करणे आणि गुंड सांभाळणे असा त्याचा अर्थ आहे. यात बाबाजीची सल गुंडांना येणार नाही. हे प्रकरण वेगळ्या दिशेने चालले आहे. यातून राज्यात भयंकर मॅसेज जाणार आहे. असे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
नामदेव शास्त्री काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे. त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा मुलगा नाही. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. या सर्वांचा समाजावर भयंकर परिणाम झाला आहे. ज्या व्यक्तीला जातीवाद माहिती नाही, त्यालाही तो माहिती झाला. त्यामुळे कायमस्वरुपी सामाजिक सलोखा बिघडला, अशी खंत नामदेव शास्त्री महाराज यांनी व्यक्त केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा