Tuesday, October 22, 2024
Homeनगरकोणत्याही सामाजिक संकटात हाक द्या, मी साथ देईन - जरांगे पाटील

कोणत्याही सामाजिक संकटात हाक द्या, मी साथ देईन – जरांगे पाटील

देवगड फाटा |वार्ताहर|Devgad Phata

ज्या ज्या वेळेस सामाजिक संकट तुमच्यावर येईल मग जात कोणतीही असू द्या एकवेळेस मनोज जरांगे पाटील यांना हाक मारून बघा, मी तुमच्या लेकरापेक्षाही चार पाऊले पुढे येईन तुम्हाला साथ देईन अशी भावनिक साद मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी घातली. गंगापूर साखर कारखाना परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रघुनाथनगर-जामगाव गंगापूर सहकारी साखर कारखाना परिसरात साकार झालेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा सुशोभिकरण लोकार्पण सोहळा मराठा आरक्षण योद्धा मनोज पाटील जरांगे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते रविवारी दुपारी झाला. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जोरदार स्वागत झाले. यावेळी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर, सोलापूर येथील जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, माजी आमदार अण्णासाहेब माने, माजी आमदार कैलास पाटील, सरपंच बशीर पटेल, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण डोणगावकर, पृथ्वीराज डोणगावकर, व्हा. चेअरमन अप्पासाहेब गावंडे, डॉ. दिनेश परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठा आरक्षण आंदोलक संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील भाषणासाठी उभे राहताच समोरून जनतेतून जल्लोष, घोषणाबाजी सुरू झाली. मनोज पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी झाली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, शेतकर्‍यांच्या उसाला चांगला भाव द्या, गोरगरीब शेतकर्‍यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. हा राजकीय कार्यक्रम नाही. म्हणून मी आलो. आम्ही कोणाचेही नाही. आम्ही 18 पगड जनतेसाठी लढतोय, विशेषतः आम्ही मराठा आरक्षण मागणीसाठी लढतोय. तुमचे योगदान मी वाया जाऊ देणार नाही. तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार आहे.
माझी झुंज तुमच्यासाठी कायम असणार आहे आणि ही झुंज यशस्वी केल्याशिवाय मी थांबणार नाही. भले कोणीही आडवा येऊ दे, कोणीही उभा येऊ दे, काल नारायणगडचा हिसका दाखवला.

आता संपले लोकसभा पुरतेच होते, असे म्हणणार्‍यांच्या पायाखालची भुई सरकली असे म्हणताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा उपस्थित जनसमुदायाने दिल्या. कृष्णा पाटील डोणगावकर आणि गणेश माने देशमुख यांनी दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याचे लोकार्पण करून एक नवा आदर्श निर्माण केला. त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. सगळ्यांना जय भीम, जय शिवराय म्हणत आपल्या भाषणाची सांगता केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या