Wednesday, March 26, 2025
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे; आंदोलनाबाबत घेतला 'हा' निर्णय

मोठी बातमी! मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे; आंदोलनाबाबत घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांचे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण (Hunger Strick) सुरु होते. त्यानंतर आता तब्बल १७ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची तयारी दर्शवली असून उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करणार असल्याचा इशाराही जरांगेंनी दिला आहे…

- Advertisement -

सिन्नर बाजार समितीच्या सभापतीपदी शशी गाडे बिनविरोध

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा मुद्दा लावून धरला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १७ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. त्यानंतर आता त्यांनी हे उपोषण मागे घेतले असून रुग्णालयात दोन दिवस उपचार घेऊन ते पुन्हा एकदा दोन ते तीन दिवसानंतर महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

Nashik Crime News : वडाळ्यात टवाळखोरांचा हैदाेस; आठ जण ताब्यात

दरम्यान, जालन्यातील (Jalna) अंबडमध्ये (Ambad) संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे लोकांना जरांगेंना भेटता येणार नाही. त्यामुळे आता जरांगे स्वत:च लोकांच्या भेटी घेणार आहेत. यासाठी त्यांनी गावातील महिलांच्या हातून रस पिऊन उपोषण मागे घेतले. त्यानंतर आता लवकरच ते आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...