Sunday, September 29, 2024
HomeराजकीयManoj Jarange Patil : फडणवीसांनंतर जरांगेंचा अमित शाहांवर निशाणा; म्हणाले…

Manoj Jarange Patil : फडणवीसांनंतर जरांगेंचा अमित शाहांवर निशाणा; म्हणाले…

जालना | Jalna

सगेसोयरेंची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून मराठा आरक्षण मिळण्यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सुरू केलेले उपोषण स्थगित केले. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातच आता पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाचे ज्येष्ठ मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले असून, थेट इशारा दिला आहे.

- Advertisement -

मराठ्यांचं आंदोलन आमच्या पद्धतीने हाताळू, असा भाजप नेते अमित शाह यांनी म्हटलं होतं. अमित शाह यांच्या या विधानाचा मनोज जरांगे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शाह यांच्या या विधानावरून जरांगे यांनी शाह यांना थेट इशाराच दिला आहे.

पटेलांचा वापर करून तुम्ही कोणत्या बेटावर काय केलं हे आम्हाला माहीत आहे. सिल्वासाच्या बेटावर काय केलं? दमणमध्ये काय केलं? अंदमानमध्ये काय केलं हे आम्हाला माहीत आहे. स्वत:च्या लोकांना खड्ड्यात घालून काय केलं हे आम्हाला माहीत आहे. पण माझ्या मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडू नका. नाही तर तुमचा राजकीय एन्काउंटर करू, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी अयोध्येतील राममंदिराच्या मुद्द्यावरुन अमित शाह आणि भाजपला लक्ष्य केले. सरसंघचालक मोहन भागवत खुटाड निघाले तर नाही तर तुम्ही कोणालाच सोडले नसते. कळस बसवण्यापूर्वी मूर्ती बसवणारे मराठा आंदोलन हाताळणार का?, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला. तु्म्ही ज्या यंत्रणा आणि एजन्सीचा वापर करता, तेदेखील एक दिवस तुम्हाला कंटाळतील. तुमच्याकडे दादा आणि गुंड आहेत, असे तुम्हाला वाटते का? तुमच्याकडे गुंड असतील तर आमच्याकडेही मराठा गुंड आहेत.

न्यायपालिकाही तुमच्यावर खुश नाही. रामदेव बाबा पाय वाकडे करुन शिकवत होता, त्यांची उत्पादनेही तुम्ही बंद केली. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजप वाढली. अमित शाह यांना कत्तली करायच्या आहेत का? दादागिरीने खुर्चीवर बसायचे आहे का? तुम्ही भाजपमध्ये काड्या लावल्या, नागपूरमध्ये तुम्ही काय केलंय, हे सगळ्यांना माहिती आहे. जनतेने तुमचे राजकीय एन्काउंटर केल्यास तुम्ही दिसणार नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. च्या या वक्तव्यावर आता भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या