छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
मुख्यमंत्री काही जातीच्या लोकांची बैठक घेताय असे कळले, मात्र मराठ्यांच्या आरक्षणात फाटा बसेल असे मुख्यमंत्री यांनी करू नये, इतकीच आमची मागणी इच्छा आहे. जातीयवादी लोकांचे ऐकू नये नसता पूढचे परिणाम गंभीर होतील. मराठ्यांच्या आरक्षणाला कुठलाही वेगळा फाटा दिला जाईल असे एकही पाऊल सरकारने मुख्यमंत्र्यांनी उचलू नये. बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये. मराठ्यांच्या पोराचे वाटोळ होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, कोणत्याही नेत्याचे ऐकून असे वागू नये नाहीतर त्याचे परिणाम भोगावे लागतील. असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
वडेट्टीवार म्हणतायत, मराठा आरक्षणासाठी जो जीआर केलाय तो रद्द करण्याची आमची मागणी आहे. “त्याचं कोण ऐकतय बुगळ्याच त्या. त्या लाल्याने सांगितले असेल, दिल्लीत गांधी एक लाल्याने सांगितल असेल, मराठ्यांच्या विरोधात बोल म्हणून. कारण काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलतेय“ असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले आहे. जातीचा नेता होऊन बसला आणि ओबीसीचा नेता नाही याचा कुणीच, ठराविक लाभार्थी आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांची औकात ओळखली आहे. कुणाच्या बापाची पेंड आहे का, GR रद्द करणं, रद्द करणं सोपी गोष्ट आहे का? आम्ही निवेदन देतो, मागणी केली, मंडल कमिशनने दिलेले आरक्षण रद्द करा, सगळ्या जाती बाहेर काढा, जशाला तशीच फाइट होणार, तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आम्ही दया माया कमी केली.
१९९४ चा जीआर रद्द करा आमची पण मागणी
मनोज जरांगे पुढे म्हणाले, आमची पण मागणी आहे, १९९४ चा जीआर रद्द करा. वरच २ टक्के आरक्षण ते पण रद्द करा. काहींनी असे सांगितले की, आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो. म्हणून बंजारा समाजाच आरक्षण घेतलं, ते बंजारा समाजासारखे दिसत नाहीत. त्यांना बाहेर काढा. यापुढे जशाला तशी फाईट होणार” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आजच्या बैठकीतील नेत्यांचा ओबीसीचा काहीही संबंध नाही
आजच्या बैठकीला ओबीसीचे नेते जाणार ते जातीचे नेते आहेत. ओबीसीचे नाही. ओबीसीचा काहीही संबंध नाही. यांच्यापेक्षा आपण ताकदवर आहे, या दोन तीन जाती सोडून बाकीच्यांनी मिळून राहायचे. मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा GR ला अवमान होईल असे त्यांचे ऐकून पाऊल उचलायचे नाही ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. छगन भुजबळ सरकार गिअरमध्ये आणायला उतरले आहेत. त्यांचं ऐकून निर्णय घ्यायचा नाही. मराठ्यांना ते पाऊल उचलायचे नाही. त्याचे ऐकून प्रमाणपत्र वाटप करणे थांबवायचे नाही. दिवाळीच्या आत मराठ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करा.
तर फडणवीस आणि विखे तुमच्या नरड्यावर येईन
मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगणे आहे की, मराठ्यांच्या आरक्षणाच्या जीआरचा अवमान होईल, अस् त्यांचे ऐकून पाऊल उचलायच नाही. ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. त्याचे ऐकून आमची प्रमाणपत्र थांबवू नका. हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा. अन्यथा पुन्हा सरकारसाठी आंदोलनाचा वाईट दिवस येईल. तुम्ही मजा बघत असाल, आज करु, उद्या करु. तर फडणवीस आणि विखे तुमच्या नरड्यावर येईन, पळायलाही जागा उरणार नाही“ असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




