जालना | Jalna
गेल्या आठ दिवसांपासून जालन्यातील (Jalna) अंतरवली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषण करत आहेत. या आठ दिवसांत जरांगे पाटील यांची उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह सत्तेतील अनेक नेत्यांनी भेट घेत त्यांना आंदोलनासाठी बळ दिले. यानंतर आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मंत्री संदिपान भुमरे, अर्जुन खोतकर या राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली…
Sharad Pawar : “नऊ वर्षांत मोदींनी फक्त…”; शरद पवारांचा घणाघात
यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाने (Delegation) मनोज जरांगे यांच्या मनधरनीचे प्रयत्न केले. तसेच आंदोलन एवढे ताणून चालत नाही, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, एक महिन्याचा वेळ द्यावा, असे मंत्री गिरिश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी म्हटले. त्यावर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री गिरिश महाजन यांना एक महिन्याचा वेळ कशाला हवा? चार दिवसांची वेळ पुरेशी आहे असे म्हणत आपण उपोषणावर (Hunger Strike) ठाम आहोत, असा प्रश्न केला. तसेच आधीही वेळ दिला आता गरज नसताना वेळ मागत आहात, असे जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाला म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली.
Shivshakti Parikrama : गळ्यात रुद्राक्षाची माळ, हातात त्रिशूळ…; पंकजा मुंडे बनल्या भोलेभक्त
यावेळी बोलतांना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारसोबत चर्चा झाली आहे. मागील ५० वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. तुम्ही म्हणाल ते करतो आधी अध्यादेश काढा. आम्ही ओबीसीमध्ये (OBC) आहोत. तरी आरक्षणापासून आम्हाला दूर ठेवले. आता चार दिवस देतो. मला अध्यादेश द्या, मला फोनवर (Phone) कळवा. मी समाजाला शब्द दिला आहे. सात वर्ष आमची जात बाहेर राहिली. ४ फेब्रुवारीपासून आमचे उपोषण सुरु आहे. अजून ४ दिवस सरकारला देतो. तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहील असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
Maharashtra Rain Update : राज्यातील ‘या’ भागांत पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?
दरम्यान, यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची मनोज जरांगे पाटलांशी चर्चा सुरू असतांना आंदोलनकर्त्यांनी उपोषणस्थळी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी करू नका, असं बजावूनही कार्यकर्ते शांत बसले नाहीत. त्यामुळे चर्चेत व्यत्यय येत असल्याने मनोज जरांगे पाटील कार्यकर्त्यांवर संतापले. ते म्हणाले की, सरकारबरोबची चर्चा बंद करायची का? त्यांनी आरक्षण दिले नाही, तरी ५० वेळा सांगितलं घोषणा देऊन देऊन उभ्या आयुष्याचं वाटोळं झालं. भानावर या ना आता तरी. ते चर्चेला आले आहेत. आपण चर्चा करू, आपल्याला नाही पटलं तर ते परत जातील. ठरवू ना काय करायचं. लगेच पाहिजे आरक्षण? मग मी कशाला बसलोय? लगेच पाहिजे म्हणूनच बसलोय ना”, अशा रागाच्या सुरात त्यांनी आंदोलकांना (Protesters) खडसावले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
मोदी सरकारने ‘इंडिया’चे नाव बदलले?; काँग्रेस नेत्याने ट्वीट करत व्यक्त केला संताप