Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर...; जरांगेंचा सरकारला इशारा

मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर…; जरांगेंचा सरकारला इशारा

जालना | Jalna

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा परत एकदा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व ओबीसी आरक्षणाचा निर्णय सरकारने अद्यापही घेतलेला नाही. त्यामुळे आज रविवारपासून (२९ ऑक्टोबर) संपूर्ण महाराष्ट्रातील गावागावात हजारो लोकांनी फक्त पाणी घेऊन आमरण उपोषण करावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी मराठा समाजाला केले. त्यामुळे राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे.

- Advertisement -

याच दरम्यान मनोज जरंगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. जोपर्यंत मला बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेसाठी यायले पाहिजे. त्यानंतर येऊन काही फायदा नाही. आमचे मराठे तुम्हाला कुठेच अडवणार नाही. आरक्षण द्यायचे की नाही एकदाच येऊन सांगायचे, बाकीची वळवळ करायची नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

सरकारशी कोणताही संवाद झाला नसून, त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळाली नाहीत. त्यांच्याकडून कसे उत्तर घायचे यासाठी आणखी दोन-तीन दिवस वाट पाहणार आहे. त्यांना माणुसकी समजत नसेल तर त्यांना उत्तर मराठाच आहे. दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे तानाजी सांवत म्हणत असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे का म्हणत नाही. त्यांनी लगेच याबाबत सांगावे, असे जरांगे म्हणाले आहेत.

मिडियाच्या कॅमऱ्यासमोर चर्चा होत नसते, समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, “ त्यांच्या कानात बोळे घातले आहे का? मग मी काल काय म्हणालो होतो. तुम्ही चर्चेला या मराठे तुम्हाला अडवणार नाही असे मी म्हणालो आहे. पण फक्त एकदाच चर्चा होणार. जोपर्यंत मला बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेसाठी यायले पाहिजे. त्यानंतर येऊन काही फायदा नाही. आमचे मराठे तुम्हाला कुठेच अडवणार नाही. आरक्षण द्यायचे की नाही एकदाच येऊन सांगायचे, बाकीची वळवळ करायची नाही, असे जरांगे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या