Tuesday, July 16, 2024
Homeभविष्यवेधकसलेला ‘जिद्दी’ अभिनेता!

कसलेला ‘जिद्दी’ अभिनेता!

मनोज बाजपेयी यांचा जन्म 23 एप्रिल 1969 रोजी झाला. ते चंदेरी दुनियेतील अभिनेते आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ते ओळखले जातात. तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सहा फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन एशिया पॅसिफिक स्क्रीन पुरस्कारांनी ते सन्मानीत आहेत. 2019 मध्ये अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीची दाखल घेऊन कलेतील योगदानाबद्दल त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

- Advertisement -

बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया शहराजवळील बेलवा या छोट्याशा गावात जन्मलेल्या मनोज यांना लहानपणापासूनच अभिनेता बनण्याची इच्छा होती. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी दिल्लीला स्थलांतर केले. मनोज यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधे प्रवेशासाठी तीन वेळेस मुलाखत दिली. परंतु तिन्ही वेळेस नापास झालेे. मनोज यांची चौथ्या वेळेस निवड झाली. चौथ्या वेळेस प्रवेश नाकारला गेला असता तर त्यांनी आत्महत्या करण्याचे ठरवले होते.

कॉलेजमध्ये शिकत असतानाही ते थिएटर करत राहिले. द्रोहकाल मधील एका मिनिटाच्या भूमिकेतून आणि शेखर कपूरच्या ‘बँडिट क्वीन’ चित्रपटातील एका डाकूच्या भूमिकेतून त्यांनी चित्रपटात पदार्पण केले. काही दुर्लक्षित भूमिकांनंतर राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ या चित्रपटात गँगस्टर भिकू म्हात्रेची भूमिका केली. हा चित्रपट प्रचंड गाजला. ते रातोरात स्टार झाले. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार मिळाला.

त्यांचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी होती. शेतकर्‍याचा मुलगा म्हणून बाजपेयी त्यांच्या सुट्टीत शेतीची कामे करायचे. मनोज यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. महेश भट्ट यांनी त्यांना दूरदर्शनवर प्रसारित झालेली ‘स्वाभिमान’ मालिका ऑफर केली ते एक संघर्ष करणारे अभिनेते होते. कमी मानधनात ही मालिका करण्याचे त्यांनी मान्य केले. पुढे दस्तक (1996) आणि तमन्ना (1997) यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये ते दिसले. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी बाजपेयींना शोधून काढले जेव्हा त्यांनी दौड (1997) या विनोदी चित्रपटासाठी कास्ट करत होते. त्या चित्रपटात त्यांची सहाय्यक भूमिका होती. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर वर्मा यांनी बाजपेयींना किरकोळ भूमिका दिल्याबद्दल खेद व्यक्त केला.

त्यानंतर त्यांनी बाजपेयींना त्यांच्या पुढील चित्रपटात प्रमुख भूमिका देण्याचे वचन दिले. सत्या (1998) हा त्यांचा पुढचा चित्रपट होता. या चित्रपटात बाजपेयींनी गँगस्टर भिकू म्हात्रेची भूमिका केली होती. सत्या 1998 मधे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. सत्या व्यावसायिकदृष्टया यशस्वी ठरला आणि बाजपेयींना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर समीक्षक पुरस्कारही पटकावला. फिल्मफेअरने नंतर बॉलीवूडच्या टॉप 80 आयकॉनिक परफॉर्मन्स च्या 2010 च्या अंकात त्याच्या कामगिरीचा समावेश केला. मनोज हे चित्रपटांमधील त्यांच्या विविध अंगी वेगेवेगळ्या चरित्रात्मक भूमिकांसाठी ओळखले जातात. मनोज वाजपेयी हे अमिताभ बच्चन, नसीरुद्दीन शाह आणि रघुबीर यादव यांना त्यांची प्रेरणा व आदर्श म्हणून म्हणून उल्लेख करतात. एक चतुरस्त्र कठोर मेहनती व मनस्वी कलाकार म्हणून म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत ते ओळखले जातात. कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारताचा चौथा-सर्वोच्च नागरी सन्मान, पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, हीच त्यांच्या यशाची पावती आहे.

उजवा हात – रुपेरी पडद्यावर एक चरित्र अभिनेता म्हणून सातत्याने काम मिळणे खूप कठीण गोष्ट आहे. चंदेरी दुनियेत संधी आणि काम अशा दोन्ही गोष्टींसाठी सतत संघर्ष करावा लागतो. मनोज यांनी अभिनेता होण्याची स्वप्न पाहिली. त्यासाठी अभिनयाचे शिक्षण व धडे गिरविले निर्मात्यांचे उंबरे झिजवले. संपूर्ण चित्रपटात एक मिनिटाच्या रोलसाठी होकार दिला, गरिबीत दिवस काढले, पैसे नसल्याने संसार मोडला तरी पण मनोज यांनी जिद्द सोडली नाही.

त्यांच्या हातावरील रेषा ग्रह यांचे फलित काय, नशीब किती प्रमाणात बलवत्तर हे प्रामुख्याने आपण अभ्यासणार आहोत. समीक्षक म्हणतात, मनोज यांच्या डोळ्यातच अभिनयाची प्रचंड ताकद आहे. मनोज यांची हृदय रेषा गुरु ग्रहावर पहिल्या बोटाच्या खाली मधोमध जाऊन थांबली आहे. त्यामुळे त्यांच्यात गुरु ग्रहाची सात्विकता, आज्ञा पालन, शिस्त, नैतिकता व पापभीरु आहे. हृदय रेषेचा एक छोटा तलम फाटा सरळ गुरु ग्रहावर थांबला आहे. त्यामुळे मनोज यांचे मन हळवे आहे. बोटांच्या पहिल्या पेरांवर बारीक बारीक फोड असल्याने ते अत्यंत संवेदनशील मनाचे आहेत. हृदय रेषा हातावरील बाकी रेषांपेक्षा रुंद व पसरट आहे. हृदय रेषा रुंद व पसरट असता अश्या लोंकांचे हृदय कोमल असते, त्यांना कायम वेदनादायक प्रसंगांना सामोरे जावे लागते.

मनोज यांच्या हातावरील मस्तक रेषा दोन आहेत. मुख्य मस्तक रेषा, मधल्या शनीच्या बोटाच्या सरळ खाली रेषेत मध्यभागी थांबली आहे. तळहाताच्या मध्यभागी थांबलेल्या या मस्तक रेषेला तिच्या थोडीशी वरून एक मस्तक रेषा उगम पावत आहे. हि मुख्य मस्तक रेषेला आडवी गेली आहे. ज्या वेळेस मुख्य मस्तक रेषेला एखादी मस्तक रेषा आडवी जाते त्या वेळेस वैवाहिक सुखात निश्चितच ती बाधा आणते. मनोज यांचा त्यामुळेच पहिला संसार मोडला. पत्नीने घटस्फोट घेतला. वैहिक सुखात बाधा आणणारा आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे विवाह रेषा. त्यांच्या हातावर लांब पण तिरकी विवाह रेषा वय वर्ष 35 च्या दरम्यान आहे. मनोज यांच्या हातावरील हि रेषा वैवाहिक सूख देणारी नाही व हि रेषा वैवाहिक सुखात कायमचे मतभेद दाखवीत आहे. त्यांच्या हातावरील भाग्य रेषा सामान्य आहे. तिचा उगम चंद्र ग्रहावरून होत आहे व मुख्य मस्तक रेषेच्या खाली हि भाग्य रेषा बारीक होऊन थांबली आहे. भाग्य रेषा मधल्या म्हणजे शनी बोटाच्या सानिध्यात आल्याशिवाय धन देत नाही. हि भाग्य रेषा शनी ग्रहाच्या कडेला असेल तर जेमतेम, धन मिळते. रेषा जाड असेल तर धन आणखी कमी मिळते. भाग्य रेषा हातावर आहे त्यापेक्षा बारीक व पातळ होते, त्या वेळेस धन प्राप्तीला सुरवात होते. त्यांच्या हातावर दुसर्‍या नंबरच्या मस्तक रेषेखाली भाग्य रेषा पातळ झाली आहे आहे व हे वय त्यांचे तीसच्या दरम्यान आहे. म्हणजे त्यांच्या जीवनात वय वर्ष तीसपर्यंत धनाची प्राप्ती अल्प होती.

त्यांच्या हातावरील पहिली मस्तक रेषा वय वर्ष पस्तीसपर्यंत आहे. ती वरच्या म्हणजे मुख्य मस्तक रेषेच्या वर त्यांचे वय 37 दाखविते. मस्तक रेषेतून उगम पावलेली हि रेषा स्वतःच्या बुद्धी चातुर्यावर धन मिळवणारी आहे. वय वर्ष 37 हा त्यांच्या आयुष्यातील टर्निग पॉईंट आहे. हि दुसरी भाग्य रेषा वय वर्ष 50पर्यंत आहे व पुढे ती पुसट झाली आहे. म्हणजे त्यांना वय वर्ष 50 पर्यंत धन लाभ आहे. त्यांच्या वय वर्ष 50 लाच हृदय रेषेतून एक आडवी रेषा खाली मस्तक रेषेकडे जाताना भाग्य रेषेला छेद देत आहे. भाग्य रेषेला हृदय रेषेतून येणारा एखादा फाटा छेदत असतो तेंव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी धन खर्ची पडते. त्यांच्या हातावर हृदय रेषेच्या वर एक पातळ भाग्य रेषा आहे व हि भाग्य रेषा त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात त्यांना कोणा समोर हात पसरावयला लावणार नाही. म्हणजेच त्यांचे वय झाल्यावर त्यांना स्वतःच्या चरितार्थाची चिंता असणार नाही.

त्यांच्या अंगठा, पहिले बोट (गुरु ग्रहाचे बोट) व मधले शनी ग्रहाच्या बोटांवर स्पष्ट आडव्या रेषा पहिल्या पेरांवर आहेत. यांचे कारकत्व म्हणजे अंगठ्याच्या पहिल्या पेरावर बर्‍याच आडव्या रेषा असता विचारांमध्ये कायम अडथळे येतात. इच्छाशक्ती कमी व्हायला लागते. मनासारखे घडत नसल्याने व्यक्ती कायम चिंतीत राहते. पहिल्या बोटाच्या पहिल्या पेरावर आडव्या रेषा असता परमेश्वरी चिंतनात अडथळे येतात, देवावरचा विश्वास कमी होतो. मधल्या बोटाच्या पहिल्या पेरावर आडव्या रेषा असता प्रवृत्ती हटवादी होते, अमुक एक गोष्ट जीवनासाठी हवीच याचा ध्यास असतो. त्यांच्या पहिल्या आणि दुसर्‍या बोटांवरील आडव्या रेषा-पहिले बोट गुरु ग्रह परमेश्वरावरचा विश्वास कमी होणारा व मधल्या बोटांवरील आडव्या रेषा या शनी ग्रहाच्याच्या अधिपत्याखाली असल्याने अभिनेता होण्याचा हटवादीपणा सूचित करतात. बोटांच्या प्रत्येक पेरांचे स्वतंत्र कारकत्व आहे. बोटांच्या टोकांकडून व्यक्तीला संवेदना प्राप्त होतात. आडव्या रेषा संवेदनांमधे अडथळे आणतात. प्रत्येक बोटाखालील असलेल्या ग्रहाचे कारकत्व किंवा फलित त्या त्या बोटाला लागू असते.

त्यांच्या हातावरील रवी रेषा उत्तम असल्याने त्यांना उशिराने मान सन्मान व प्रसिद्धी मिळाली. मनोज जिद्दी स्वभावाचे आहेत व हा स्वभाव अंगठ्याच्या दुसर्‍या पेराने दिला आहे. मनात कितीही चलबीचल झाली तरी, अभिनेता होण्याच्या ध्येयाने ते पछाडलेले होते. त्यांच्या आयुष्यात त्यांना यश मिळण्यासाठी खूप झगडावे लागले. परंतु सूर्य ग्रह उशिराने मेहेरबान असेना का त्यांना त्यांच्या आयुष्यात मध्यम वयात प्रसिद्धीचा लाभ झाला. मात्र प्रसिद्धी आहे, त्या मानाने भाग्य रेषा कमजोर असल्याने त्यांना मोठ्या आर्थिक लाभापासून वंचित राहावे लागले. त्यांची एक उच्च दर्जाचा अभिनेता म्हणून आंतराष्ट्रीय ओळख आहे. मनोज वेबसिरीज मधे व्यस्त आहेत. त्यांच्या हातावर रवी रेषेचा एक फाटा तिसर्‍या व चौथ्या बोटांच्या मधल्या भागातील पेर्‍यात गेल्याने त्यांना येथून पुढे आंतराष्ट्रीय ख्यातीमधे येथून पुढे निश्चितच वाढ होणार आहे. हातावरील रवी रेषेचा फाटा जर तिसर्‍या व चौथ्या बोटांच्या पेर्‍यात जात असेल तर सर्व दूर देशी व विदेशात त्या व्यक्तीची ख्याती कीर्ती नक्की होते. मनोज सध्या 54 वर्षाचे आहेत. हातावरील भाग्य रेषा वय वर्ष 55 पासून बारीक व तलम झाली असल्याने त्यांच्या आर्थिक क्षमतेत निश्चितच वा

- Advertisment -

ताज्या बातम्या