नंदुरबार ।nandurbar । प्रतिनिधी
आज दि.31 जानेवारी रोजी दुपारी नवजीवन एक्सप्रेस (Navjeevan Express) रेल्वे मधुन जाणार्या एका प्रवाशाला (traveler) नंदुरबार जवळ अचानक हृदयविकाराचा (heart attack) झटका आला होता़.गाडी नंदुरबार रेल्वे स्थानकावर पोहचताच रेल्वे पोलीसांनी (Railway Police) तात्काळ धाव घेत रुग्णवाहिकेला बोलावून रुग्णाला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल (Admitted to district hospital) केल्याने रुग्णाचा जीव वाचला.नंदुरबार रेल्वे पोलीसांनी माणूसकीचे ‘दर्शन घडविल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तीनशे रूपयांची लाच ‘मनिषा’ला घेवून गेली गजाआडPhotos # गोद्री कुंभाच्या समारोपाप्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांचे मोठे वक्तव्य
याबाबत अधिक माहिती अशी कि, आज दि.31 जानेवारी रोजी दुपारी नवजीवन एक्सप्रेस रेल्वे (क्र.12655) मध्ये जनरल बोगीत श्रीनिवास नरसिया कस्तुरी(वय 48,रा.उधना,सुरत) हे पत्नी तेजस्वीनी व मुलगी लक्ष्मी यांच्यासोबत वारंगल ते सुरत प्रवास करत असतांना प्रवास करत होते. नंदुरबार रेल्वेस्थानक जवळ येत असतांना अचानक श्रीनिवास कस्तूरी यांच्या छातीत कळा येवू लागल्या.
त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे माहिती मिळताच रेल्वेतील अधिकार्यांनी तात्काळ स्टेशन मास्तर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.याबाबत नंदुरबारचे स्टेशन मास्तर यांनी रेल्वे पोलीसांना कळविताच गाडी येण्याआधी रेल्वे पोलीसांनी प्लॅटफार्मवर धाव घेतली.रुग्णवाहिकेला तात्काळ पाचारण करण्यात आले. पोलीस हवालदार प्रकाश गोसावी, रवी पाटील व पोलीस नाईक विशाल कातीलकर यांनी श्रीनिवास कस्तूरी यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेले.
Beauty Part 3 : हिवाळा ते उन्हाळा संक्रमणासाठी आपली त्वचा सज्ज करा…
वेळीच रुग्णालयात नेल्याने श्री.कस्तुरी यांचा जीव वाचला.यामुळे श्रीनिवास यांच्या पत्नी तेजस्वीनी व मुलगी लक्ष्मी यांनी पोलीसांना धन्यवाद दिलेत.दरम्यान,रेल्वे पोलीसांनी माणूसकीचे दर्शन घडविल्याने त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
या घटनेनंतर श्रीनिवास यांच्या पत्नी तेजस्वीनी यांनी याबाबत पोलीस कर्मचार्यांचे आभार मानले. तेजस्वीनी यांच्यावर आलेले अचानक संकट टळल्याने सुटकेचा सुस्कारा टाकला.
Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअप