Saturday, May 4, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात आज 'इतक्या' नागरिकांनी घेतली लस

जिल्ह्यात आज ‘इतक्या’ नागरिकांनी घेतली लस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात दिवसभरात पहिला आणि दुसरा डोस दोन्ही मिळून जवळपास ४९ हजार ९९२ जणांना करोना प्रतिबंधक लसीचे डोस (Corona Vaccine) देण्यात आले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २२ लाख ९७ हजार ०२३ नागरीकांना लस देण्यात आली आहे….

- Advertisement -

जिल्ह्यात (Nashik District) लसीकरण (Vaccination) सुरू झाल्यापासून करोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याचा सामना करत अडखळत लसीकरण सुरू आहे. शहर तसेच जिल्ह्यात लसींची मागणी वाढली आहे.

परंतु त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने लसींचा तुटवडा जाणवत होता. काल जिल्ह्याला मुबलक लसी उपलब्ध झाल्याने या आठवड्यात लसीकरणाचा वेग वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

16 जानेवारी 2021 पासून संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. आज दिवसभरात नाशिक महापालिकेच्या ९० तर ग्रामीण भागातील ९६ व मालेगाव ७ अशा एकूण १९३ केंद्रांवर लसीकरण सुरू होते.

आज दिवसभरात जिल्ह्यात ३८ हजार ०६८ जणांना पहिला डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत (Nashik City) १८ हजार ६६७, ग्रामिण भागात (Nashik Rural) १९ हजार ०४१, मालेगाव (Malegoan) ३६० असे लसीकरण झाले आहे.

तर ११ हजार ९२४ जणांना दुसरा डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत ६ हजार ६८२, ग्रामिण भागात ५ हजार १५८, मालेगाव ८४ असे लसीकरण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या