Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Andolan : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंना भेटणार, तोडगा निघणार का?

Maratha Andolan : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंना भेटणार, तोडगा निघणार का?

मुंबई | Mumbai

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आजपासून ते आपल्या आंदोलनाची धार अधिक तीव्र करणार आहेत. सरकारने अध्यादेश घेऊन यावं, नाहीतर आजपासून पाण्याचा त्याग करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. संध्याकाळी 5 नंतर मनोज जरांगे पाटील पाण्याचा त्याग करणार आहेत. सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी अध्यादेशाच्या मागणीवर ठाम आहेत. चर्चेशिवाय मार्ग नाही हे आम्हाला समजतं. पण, नुसत्या चर्चा करुन अंत पाहू नका, असं त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, मनोज जरांगे यांच्यासह उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज (0५ सप्टेंबर) औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि उदयनराजे भोसले यांचे शिष्टमंडळ जाणार आहे. यापूर्वी देखील एकदा गिरीश महाजन यांना पाठवून सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र त्यात यश मिळाले नव्हते. त्यामुळे आज दुसऱ्यांदा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जात आहे.

Maratha Andolan : “फडणवीस म्हणतात राजकारण करू नका, पण…”; राज ठाकरेंचा थेट निशाणा

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे. आज या उपोषणाचा आठवा दिवस आहे. दरम्यान, उपोषणस्थळी दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडून अमानुषपणे लाठी हल्ला करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्याने सरकार अडचणीत सापडले आहे. तर, मनोज जरांगे यांनी आजपासून पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यातच राज्यभरात या उपोषणाला मोठा पाठींबा मिळत आहे. तसेच ठिकठिकाणी आंदोलन आणि बंद पाळण्यात येत आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जाणार आहे. त्यामुळे यावर आज काही तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Maratha Andolan : “महाराष्ट्रात तीन-तीन जनरल डायर, तो अदृश्य फोन कॉल…”; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

- Advertisment -

ताज्या बातम्या