Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्यामराठा समाजाकडून शासनाच्या परिपत्रकाची होळी

मराठा समाजाकडून शासनाच्या परिपत्रकाची होळी

नाशिक । प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीला अौरंगाबाद येथील मधुरम बॅक्वेंट हाॅलमध्ये सुरुवात झाली आहे. आरक्षणाच्या मुद्यावर समाज आक्रमक असून बैठकिपुर्वी राज्य शासनाने समाजासाठी केलेल्या घोषणांच्या परिपत्रकाची होळि करुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

- Advertisement -

बैठकीला छत्रपती खा. संभाजीराजे भोसले उपस्थित आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील समन्वयक देखील बैठकीला उपस्थित आहे. छत्रपती खा. उदयन राजे भोसले यांचा संदेश

त्याचे भाचे यश राजे भोसले यांनी वाचला. मी समाज बांधवा सोबत आहे. आरक्षणा स्थगिती मिळाल्याने मी अस्वस्थ आहे. मला खासदारकीची राजीनामा लागला तरी मी देईन. परंतु राज्य व केंद्र सरकारने आरक्षणा बाबत योग्य निर्णय घ्यावा असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या