नाशिक | प्रतिनिधी Nashik
- Advertisement -
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला ऐतिहासिक निर्णय व मंत्रिमंडळ उपसमितीची जरांगे पाटील यांच्यासोबत झालेली सकारात्मक चर्चा या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर जिल्हा भाजपच्या वतीने आंदोत्सव साजरा करण्यात आला.
आंदोत्सव साजरा करण्याकरिता सांयंकाळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने अशोक स्तंभ येथे जमले होेते. शहराध्यक्ष सुनील केदार, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव , महेश हिरे, उत्तम उगले, सुरेश पाटील, स्वाती भामरे, अर्चना भामरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाबद्दल अभिनंदन केले. गुलाल उधळुन जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.





