Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसगे सोयरे लागू करा अन्यथा…; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

सगे सोयरे लागू करा अन्यथा…; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

पुणे | Pune
मराठा मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांनी आज मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही दिवस उरले आहे. त्या पार्श्वभुमीवर जरांगे पाटील यांनी आज पुण्यात ही घोषणा केली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास विधानसभेच्या सगळ्या २८८ जागा लढवू अशी घोषणा त्यांनी आज केली आहे.

सगे सोयरे अंमलबजावणी आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर विधानसभेच्या रिंगणात २८८ उमेदवार उभे करणार अशी थेट घोषणाच मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी विधानसभेला उमेदवार दिल्यास सत्ताधाऱ्यांना त्याचा फटका बसू शकतो.

- Advertisement -

मी जातीवाद करत नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा इतकंच मी म्हणालो होतो. यासोबतच येत्या ४ जून पासून आपण पुन्हा उपोषण सुरु करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

कायद्यापुढे सगळे समान आहेत. कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. सगळ्यांनी कायद्याचा सन्मान राखायला हवा. विनाकारण आरोप करणाऱ्यांच्या आरोपात किती तथ्य असते हे सगळ्यांना माहीत आहे. सरकारला माझ्या विरोधात काहीच सापडत नाही म्हणून ही केस ओपन झाली का, असा प्रश्न त्यांनी विचारला.

तर नाव घेऊन पाडू
मी ग्राउंडवरच्या ओबीसीला कधीच दुखावले नाही, कारण मी नेत्यांवर बोलतो. नेते हे कोणाचेच नसतात. त्यांच्याकडून शांततेचे आवाहन होत नाही. कदाचित त्यांना शांतत बिघडवायची असेल. मी निवडणुकीतच नाही मग कस कळणार की कोण निवडून येईल. मी कोणाचे नाव घेवून बोललो नाही की याला पाडा. पण जर मस्ती असेल तर विधानसभेत नाव घेवून पाडू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. हा रोख कुणावर होता हे बीडमधील ताज्या घडामोडींवरुन लक्षात येतो.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या