Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजManoj jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच ठरलं! म्हणाले, दसरा मेळावा...

Manoj jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच ठरलं! म्हणाले, दसरा मेळावा होणार, १२ वाजता एकजूट…

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati SambhajiNagar
ओबीसीतून मराठा आरक्षण, सगेसोयरेंची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातच आता मनोज जरांगेंनी दसरा मेळावा घेणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

काय म्हणाले जरांगे?
नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. मी दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. मराठा समाजाने प्रचंड संख्येने नारायण गडावर यायचे आहे. सर्वांनी एकजूट दाखवायची आहे. नारायण गडावर राजकीय बोलणे किंवा निर्णय होणार नाही. अशी एकजूट आणि शक्ती दाखवा, अशी की पुन्हा अशी एकजूट असणार नाही. मी दसरा मेळाव्याला जाणार आणि बोलणार पण आहे. दसरा मेळाव्याला तुफान वेगाने मराठा समाज येणार आहे. दसऱ्याच्या दिवशी १२ वाजता नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. वेळ १२ वाजेची वेळ ठरलेली आहे, येणाऱ्या सर्व भक्तांना माझी विनंती आहे दर्शन जरी सर्वांचे झालं. तरी २ वाजेपर्यंत गडावरच राहायचे आहे, असे मनोज जरांगे म्हणालेत.

- Advertisement -

हे ही वाचा : Ramdas Kadam : आनंद दिघे यांच्या नावाचे राजकारण नको म्हणून…; रामदास कदमांचा उध्दव ठाकरेंवर गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मी राजकीय भाषा करीत नाही आणि राजकारण करणार नाही. सरकारने केवळ आमच्या मागण्या पूर्ण करा एवढेच देवेंद्र फडणवीस यांना सांगणे आहे. सरकारने अभ्यासकांना बोलावल्याचे सांगितले आहे. आता सरकारला कशाला अभ्यासक पाहिजे. सरळ सांगतो सरकारला अभ्यासक बोलावण्याचे नाटके बंद करा.

१३ महिने झाले सरकार अभ्यासकांशी चर्चा करीत आहेत. हा जर तुमचा ट्रॅप असेल तर सरकारला काहीही मिळणार नाही. आम्ही आमच्या मागण्यावर ठाम राहणार आहोत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, यासह अन्य मागण्या मंजुर कराव्यात अन्यथा आगामी निवडणूक घेऊन तुम्हाला पश्चाताप होईल. माझ्या विरोधात रान उठवून काही होणार नाही. ४० वर्षांपासून तीच तीच चर्चा सुरू आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या