मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची टिप्पण्णी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांना चांगलीच भोवली. आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांच्या माजलगाव (Majalgaon) येथील घरावर मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांनी दगडफेक केली असून यात वाहनांची जाळपोळ, बंगल्याची तोडफोड करण्यात आली आहे…
Maratha Reservation : राज्य सरकारचे शिष्टमंडळ घेणार मनोज जरांगे पाटलांची भेट; उपोषण सोडण्याची करणार विनंती
यावेळी बोलतांना आमदार सोळंके म्हणाले की, “मी माजलगावमध्ये असून आज सकाळी अचानक काही आंदोलक माझ्या घरी आले. माझ्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. घराचं, ऑफिसचं आणि गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केले. आपल्या माध्यमातून मी सर्व आंदोलकांना विनंती करणार आहे की, मी मराठा समाजाचाच आमदार आहे आणि माझाही मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. आरक्षण मिळावं अशी माझीही मागणी आहे. काही राजकीय विरोधक असतात जे काही बाबतीत चिथावणी करु शकतात. माझा कोणत्याही आंदोलकांवर राग नाही, मी त्यांच्या भावना समजू शकतो की, त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे अशा बाबतीत राजकीय विरोधक संधी घेतात, असाच प्रकार याबाबतीत झाला असल्याचं मला वाटतं, असे त्यांनी म्हटले.
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा जीव घ्यायचा आहे का? हंबरडा फोडत महिला आंदोलकाचा सरकारला सवाल
पुढे ते म्हणाले की, मला आंदोलकांशी बोलण्याची संधीच मिळाली नाही. माझ्या घरावर थेट दगडफेक करायला सुरुवात केली. कोणी काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हते. माझ्या घराला चारही बाजूंनी वेढा दिला. त्यामुळे चर्चा करण्याचा प्रश्नच आला नाही. मी पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून विनंती करतो की, माझाही मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे. मीसुद्धा मराठा समाजाचाच आमदार आहे. काहीजण अर्धवट क्लिप काढून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हेच माझ्याबाबतीत घडलं आहे. सर्व आंदोलकांना माझी हात जोडून विनंती आहे, यांच्याच प्रेमाच्या जोरावर मी आमदार झालो आहेत. माझा मराठा समाजाच्या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे,” असे प्रकाश सोळंके यांनी म्हटले.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Maratha Reservation : ” ‘माझा आवाज चालू आहे, तोपर्यंत…”; मनोज जरांगे पाटलांचे सरकारला आवाहन