Monday, July 22, 2024
Homeनगरमराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ नेवासाफाटा येथे रास्ता रोको

मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ नेवासाफाटा येथे रास्ता रोको

नेवासा फाटा |वार्ताहर| Newasa Phata

- Advertisement -

अंतरवली सराटी येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ नेवासा तालुका सकल मराठा समाजाकडून अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले. महिला आंदोलक, लहान मुले देखिल गंभीर जखमी झाले. नेवासा तालुक्यात देखिल या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून नेवासा तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर दीड तास रस्ता रोको आंदोलन करून निषेध सभा घेण्यात आली.

यावेळी लाठीमार करणार्‍या पोलिसांना तातडीने निलंबित करण्यात यावे, जखमींना तातडीने आर्थिक मदत जाहिर करावी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, सदर घटनेची सीबीआई कडून चौकशी करण्यात यावी, मराठा समाजास आरक्षण कधी देणार, सरकार यासाठी कोणती ठोस भूमिका घेणार हे स्पष्ट करावे अशा मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी आक्रमक भूमिका घेत आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. पोलीस निरीक्षक यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.

आंदोलनात राजेंद्र वाघमारे, संभाजी माळवदे, काशिनाथ नवले, पीआर जाधव, गणेश निमसे, बाबा अरगडे, वकील संघाचे बन्सी सातपुते, कल्याणराव पिसाळ, गणेश चौगुले, रावसाहेब घुमरे, सरपंच दादा निपुंगे, संदीप अलवणे, अनिल टाके, दादासाहेब गंडाळ, सचिन नागपुरे, सूरज नांगरे , गणेश झगरे आदींनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी सोमनाथ गायकवाड, संदीप मोटे, नितीन अडसुरे, महेश निपुंगे, अभिजित निपुंगे, मुन्ना चक्रनारायण, नारायण लष्करे, भास्कर लिहिणार, गोरक्षनाथ काळे, संजय लिपाने, विष्णू उंदरे आदींसह तालुक्यातील विविध गावातून आलेले नागरिक उपस्थित होते. पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

- Advertisment -

ताज्या बातम्या