Saturday, May 25, 2024
Homeजळगावराज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण रद्द

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण रद्द

जळगाव- Jalgaon

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रात संघर्ष करण्यात आला. या संघर्षाला फडणवीस सरकार असतांना यश आले. मात्र, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप, शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायक मेटे National President of Shiv Sangram MLA Vinayak Mete यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

- Advertisement -

विधीमंडळाची अंदाजपत्रक समितीतील सदस्य म्हणून, जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले असता, ते अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजासाठी काही पाऊल उचलावे, सोयी-सुविधा देवून मराठा समाजाला दिलासा द्यावा. अशी अपेक्षा होती. दुदैर्वाने सरकार अपयशी ठरले असे म्हणत, आमदार मेटे MLA Mete यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष ॲड. दिलीप पोकळे, ॲड. राजेश गवई आदी उपस्थित होते.
२ सप्टेंबरपासून आंदोलन
राज्य मागासवर्गीय आयोगाकडे हा विषय सोपवून सर्व्हेक्षण करणे आणि मागासलेपण सिध्द करणे अपेक्षित होते. मात्र, या सरकारने काहीच केले नाही. अक्षरशः मराठा समाजाचे वाटोळे केल्याचा घणाघात आमदार मेटे यांनी केला. राज्य सरकारने २ सप्टेंबरपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय न घेतल्यास २ सप्टेंबरपासून राज्यात टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार मेटे यांनी दिला. गणेशोत्सवानंतर मुंबईत उपोषण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्य सरकार निगरगठ्ठ असून, मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्याची घोषणा आमदार मेटे MLA Mete यांनी यावेळी केली.

मागासवर्गीय आयोग जातीयवादी
मराठा आरक्षणासाठी Maratha reservation मागासर्गीय आयोग नेमण्यात आलेला आहे. मात्र यातील सदस्य जातीयवादी असल्याचा आरोप मेटे यांनी केला. या समितीतील अशोक चव्हाण यांची हाकालपट्टी करावी आणि आयोगाची पुर्नरचना करावी अशी मागणीदेखील आमदार मेटे यांनी केली.
ठाकरे सरकारचे मराठा समाजावर बेगडी प्रेम
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सत्ता मिळवायची, पद मिळवायचे, खुर्ची मिळवायची मात्र त्यांच्या स्मारकासाठी काहीही करायचे नाही. अशी ठाकरे सरकारची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत या सरकारने आढावा घेतला नाही, काम बंद का आहे, हे त्यांना माहीत नाही. केवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरायचे आणि सत्ता उपभोगण्याचे काम ठाकरे सरकारकडून सुरु आहे. मराठा समाजावर नुसते बेगडीप्रेम आहे का? पुतणा मावशीचे प्रेम आहे का? असे वाटायला लागले असल्याचेही ते म्हणाले.
राज्य सरकारची दुटप्पी भूमिका
समाजासमाजात भांडण लावण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जात आहे. या राज्य सरकारची भूमिका दुटप्पी असल्याची टीका आमदार विनायक मेटे यांनी यावेळी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या