मुंबई | Mumbai
काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांना छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षिय खासदारांना आवाहन केले आहे. त्यांनी याबत एक सर्व खासदारांना उद्देशून एक पत्र लिहले आहे.
- Advertisement -
छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रात म्हंटले आहे की,”आपण सर्व जण मराठा आरक्षण प्रश्नांविषयी जाणताच. महाराष्ट्रातील विधान सभा आणि विधान परिषदेने एकमताने मराठा आरक्षण मंजूर केले. ते राज्यात लागू सुद्धा झाले. त्यानंतर काही लोकांनी न्यायालयात धाव घेऊन आरक्षणाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर प्रश्न उपस्थित करून ते पुढील निर्णयाकरिता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले आहे.