Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Reservation : मुख्यमंत्री शिंदेंचे जरांगे पाटलांना आवाहन; म्हणाले, झटकन हा निर्णय...

Maratha Reservation : मुख्यमंत्री शिंदेंचे जरांगे पाटलांना आवाहन; म्हणाले, झटकन हा निर्णय…

मुंबई | Mumbai

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला असून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आज (३० ऑक्टोबर) रोजी जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. अशातच आज मुंबईत (Mumbai) सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत नेमका कोणता निर्णय झाला याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी करत जरांगे पाटलांना आवाहन केले आहे…

- Advertisement -

Maratha Reservation : अजित पवार गटाच्या आमदाराच्या घरावर मराठा आंदोलकांची दगडफेक

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. जरांगे पाटील यांनी स्वत:च्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, त्यांनी वैद्यकीय उपचार (Medical Treatment) घेतले पाहिजेत, पाणी घेतले पाहिजे, आम्हालाही त्यांच्या तब्येतीची काळजी आहे. झटकन हा निर्णय सरकार घेऊ शकत नाही. कारण ते आरक्षण कायद्याच्या चौकटीत मिळावे ही आमची भावना आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा जीव घ्यायचा आहे का? हंबरडा फोडत महिला आंदोलकाचा सरकारला सवाल

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जरांगे पाटील यांनी जो मराठा समाजासाठी (Maratha Community) लढा सुरू केला आहे, त्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर आहे. म्हणून आज आम्ही बैठक बोलावली आहे. मराठा समाजाला न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे, टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून सरकारने आरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी उद्या आमचे प्रतिनिधी, आपली उपसमिती, सरकारचे अधिकारी चर्चा करतील. त्यांनाही विनंती कमिशनर, जिल्हाधिकारी करतील. ५८ मोर्चे शांततेच निघाले होते, कुठेही गालबोट लागले नाही. त्यामुळे लाखोंचे मोर्चे निघूनही कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. तसेच आज या आंदोलनाला गालबोट लागल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही शिंदेंनी म्हटले.

Maratha Reservation : ” ‘माझा आवाज चालू आहे, तोपर्यंत…”; मनोज जरांगे पाटलांचे सरकारला आवाहन

ते पुढे म्हणाले की, “मराठा समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या मुला-बाळांचा, आई-वडिलांचा विचार करावा. त्यांना भावनिक आवाहन करू इच्छितो की, राज्यात कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखणं ही सरकारची जशी जबाबदारी आहे तशीच नागरिकांची देखील जबाबदारी आहे. मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील ही जबाबदारी घेतली पाहिजेत. जरांगे पाटील यांनी पाणी आणि अन्न घ्यावे. तसेच सरकारला थोडा अवधी द्यावा”, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नांदगाव तालुक्यात मोठी कारवाई; देहव्रिक्री रॅकेटचा पर्दाफाश

- Advertisment -

ताज्या बातम्या