Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘सह्याद्री’वर खलबतं होणार

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘सह्याद्री’वर खलबतं होणार

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. अनेक ठिकाणी हिंसक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

राज्य सरकारने मराठा आरक्षणसाठी आणखी एक पाऊल उचललं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील आंदोलन हिंसक होताना पाहून राज्य सरकार सतर्क झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर उद्या सकाळी साडेदहा वाजता ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलाय. निवृत्त न्यायाधीशांच्या समितीच्या नोंदी मिळालेल्यांच्या वंशाना आरक्षण देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी मागासवर्ग आयोग नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार आहे. याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारोती गायकवाड, न्या संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रकरणांत शासनाला मार्गदर्शन करणार आहेत, अशी देखील माहिती समोर आलीय.

- Advertisment -

ताज्या बातम्या