Saturday, May 25, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : CM शिंदेंच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक सुरू; मोठा निर्णय होण्याची...

Maratha Reservation : CM शिंदेंच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक सुरू; मोठा निर्णय होण्याची शक्यता

मुंबई | Mumbai

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची महत्वाची बैठक सुरू झाली आहे.

- Advertisement -

त्यामुळे या बैठकीत काय होणार याकडे मराठा आंदोलकांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. या बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्याचसोबत या बैठकीनंतर मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या