Saturday, June 15, 2024
Homeनगरकोल्हारमध्ये नेत्यांच्या पोस्टर्सची गाढवावरून धिंड

कोल्हारमध्ये नेत्यांच्या पोस्टर्सची गाढवावरून धिंड

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

- Advertisement -

मराठा आरक्षण आणि आंदोलनाच्या विरोधात बरळणार्‍या नेत्यांच्या पोस्टर्सची गाढवावरून कोल्हार भगवतीपूर येथे धिंड काढण्यात आली. येथील सकल मराठा समाज बांधवांनी यातून या नेत्यांच्या विरुद्ध आपला संताप व्यक्त केला. गाढवाच्या गळ्यात व पाठीवर अडकविलेल्या या फोटोंच्या पोस्टर्सची धिंड कोल्हार भगवतीपूर परिसरात चर्चेचा विषय ठरली.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून तीव्र बनलेल्या आंदोलना विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍या नेत्यांना आता सकल मराठा समाज बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळ, नारायण राणे, गुणरत्न सदावर्ते, रामदास कदम यांच्या फोटोचे फ्लेक्स पोस्टर्स बनविण्यात आले. त्या पोस्टर्सवरील फोटोंच्या खाली त्यांची नावेही टाकण्यात आली. हे सर्व पोस्टर्स प्रत्येकी एका गाढवाच्या गळ्यात व पाठीवर लटकविण्यात आले. ही गाढवे दिवसभर गावात मोकाट फिरत होती.

त्यामुळे प्रत्येकजण याकडे पाहून हसू लपवू शकला नाही. गाढवांच्या गळ्यात व पाठीवर टांगलेल्या या नेत्यांच्या पोस्टर्सचे अनेकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. सोशल मीडियावर या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. निषेध नोंदविण्याचा या अनोख्या प्रकाराची काल दिवसभर कोल्हार भगवतीपूर आणि परिसरात चर्चा होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या