Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : अल्टिमेटम संपला! मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार

Maratha Reservation : अल्टिमेटम संपला! मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार

जालना | Jalana

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला वेळ संपला आहे. त्यामुळे आंदोलनाचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारला दिलेलं ४० दिवसांचं अल्टिमेटम संपलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. तसेच, प्रत्येक जिल्हा पातळीवर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. तसेच पुढाऱ्यांनांही गावबंदी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यानंतर मोठा भडका उडाला होता. त्यानंतर सरकारने चर्चा करून आरक्षणाबाबत आश्वासन दिले होते. त्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. या चाळीस दिवसांच्या काळात सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, या मुदतीत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता पुढे काय करणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. याआधी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते पुढील आंदोलनाबाबत माहिती देतील असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांनी मनोज जरांगे यांना सरकारला थोडा वेळ देण्याची विनंती केली आहे. मात्र, यावर मनोज जरांगे यांनी आता कोणालाही वेळ दिला जाणार नाही, त्यांनीच वेळ घेतलेला आहे. चाळीस दिवसाचा आणि समाजाने मुख्यमंत्र्यांच्या सन्मान ठेवला आहे एक महिन्यापेक्षा अधिक दिवस सरकारला दिले होते, वेळ त्यांनी स्वतः घेतलेला आहे, त्यामुळे आता वेळ मिळू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या