Saturday, May 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange Patil: आता हिशेब होणार, बदलाच घेणारच…; मनोज जरांगे यांचा एल्गार

Manoj Jarange Patil: आता हिशेब होणार, बदलाच घेणारच…; मनोज जरांगे यांचा एल्गार

जालना | Jalna

- Advertisement -

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील नेत्यांच्या जागा वाटपाचा चर्चा नाही वेग आलाय.

दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अनेक राजकीय तज्ञ अभ्यासक आणि वकिलांसोबत यांनी आज महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीपूर्वी मनोज जरांगे यांनी सरकार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले, आम्हाला संपवण्यास निघालेला आम्ही संपवणार म्हणजे संपवणार आहे. मग त्यासाठी कोणतीही प्रक्रिया असो. आमची सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील संधी हिरावून घेतली. आता हिशेबच होणार आहे. बदलाच घेणारच आहोत. आमचे सुख या सरकारला पाहता आले नाही. हा आनंद हिरवून घेणाऱ्यास आता सोडणार नाही. आमच्या हाततोंडाला आलेला घास काढला. आमचा हातही छटला आणि घासही काढला. सुडबुद्धीने आम्हाला मिळत असलेले आरक्षण काढून घेतले, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

सरकार अन् देवेंद्र फडणवीस यांना काहीच अधिकार नसताना त्यांनी आमचे बळी घेतले. शेवटी जातात जातात आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात घातल्या. परंतु मराठ्यांना काही दिले नाही. मराठ्यांचे मुले मोठे होऊ नये, या भूमिकेतून ते उतरले. आता त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. त्यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल ती करु. आमचा समाजाला इतके टार्गेट करण्याची गरज नव्हती. सरकारने आमच्या समाजाची मने दुखवली आहे. सरकारने सूडबुद्धीने वार करत आरक्षण हिरावून घेतले आहे. त्यांनी जाती जातीत खून्नस लावून दिली. ते अत्यंत क्रूर आहेत. जातीत जातीत त्यांनी विष पेरले आहे. आता त्यांचा पडाव मराठा लोकच करणार आहे. असा इशारा त्यांनी दिला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ISIS Terrorist Arrest Mumbai : मुंबई विमानतळावर ISIS च्या 2 दहशतवाद्यांना...

0
मुंबई । Mumbai राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने मुंबई विमानतळावरून दोन फरार दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दोघे इस्लामिक स्टेट (ISIS) या बंदी घातलेल्या दहशतवादी...