Saturday, November 16, 2024
Homeराजकीयमराठा आरक्षण : संभाजी ब्रिगेडचे मशाल आंदोलन

मराठा आरक्षण : संभाजी ब्रिगेडचे मशाल आंदोलन

पुणे | प्रतिनिधी

मराठा आरक्षणाला स्थगिती नायालायाने दिल्यानंतर मराठा समाजामध्ये असंतोष दिवसेंदिवस वाढत असून राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी काढलेला अद्यादेश तात्काळ रद्द करावा तसेच मराठा आरक्षण स्थगिती उठवावी. या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज पुण्यात मशाल आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडचे केंद्रिय निरीक्षक विकास पासलकर, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, विराज तावरे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, अविनाश मोहिते, संतोष शिंदे, निलेश ढगे, मंदार बहिरट यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध मागण्याही सरकारपुढे मांडण्यात आल्या.

याबाबत बोलताना विकास पासलकर म्हणाले, मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा, राज्य सरकारमधील शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी काढलेला अद्यादेश तात्काळ रद्द करावा, मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या नव्याने होणार्‍या सर्व प्रवेश प्रक्रिया मध्ये सरकारने 50% फी सवलत द्यावी, त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, जो पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत पोलीस भरती सह कुठलीही मेघा भरती प्रक्रिया राज्यसरकार ने घेतली जाऊ नये, राज्यसरकारने सारथीला तात्काळ वाढीव आर्थिक मदत द्यावी, एमपीएससीच्या होऊ घातलेल्या परीक्षा संदर्भात मराठा मुलांनी एससीबीसीच्या कोट्यातून फॉर्म भरले आहेत.. त्याचं काय होणार याचा खुलासा तत्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने करावा, मराठा आरक्षणावरील स्थगिती त्वरीत हटवावी आणि तोपर्यंत मराठा समाजाचा समावेश ईडब्ल्युएस आरक्षणामध्ये करावा, सरकारने मराठा आरक्षणाला संरक्षित करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करावी, आदि मागण्या सरकारकडे सादर करण्यात आल्या असून त्याची दखल घेण्यात यावी.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या