Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Reservation : सर्वपक्षीय आमदारांनी ठोकले मंत्रालयाला टाळे; पोलिसांकडून धरपकड

Maratha Reservation : सर्वपक्षीय आमदारांनी ठोकले मंत्रालयाला टाळे; पोलिसांकडून धरपकड

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात सध्या चांगलाच पेटला असून आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी मराठा आंदोलकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. अशातच आता या आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत पोहोचली असून आज सर्वपक्षीय मराठा आमदारांनी एकत्रित येत मंत्रालय (Mantralaya) परिसरात आंदोलन केले….

- Advertisement -

Maratha Reservation : “मी स्वतः गृहखात्याला फोन करुन …”; गाडीची तोडफोड केल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया

यावेळी मंत्रालयाच्या पायऱ्यांवर बसून, हातात फलक घेऊन आमदारांनी (MLA) मराठा आरक्षणाच्या समर्थनात घोषणाबाजी केली आहे. तसेच या आमदारांनी मंत्रालयाला टाळे ठोकून प्रतिकात्मक आंदोलन केले. मंत्रालयाचे कामकाज आजपासून बंद ठेवू, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आ्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी आमदारांसह सर्वपक्षीय आमदारांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर पोलिसांनी (Police) या मराठा आमदारांना ताब्यात घेतले. त्यामुळे आता सत्ताधारी आमदारांसह विरोधी आमदारांनी आंदोलन केल्याने शिंदे-फडणवीस-पवार सरकारवरील दबाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

Sanjay Raut : “मुख्यमंत्री संकुचीत मनोवृत्तीचे, सरकारची घटिका भरली…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

दरम्यान, यावेळी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) म्हणाले की, “विशेष अधिवेशन बोलवा, मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या. मात्र, सरकारकडून सातत्याने वेळकाढूपणाची भूमिका घेतली जात आहे. यामुळे मराठा समाजाचा उद्रेक होत आहे. हा उद्रेक थांबवायचा असेल तर लवकर आरक्षण घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या आंदोलनात आमदार राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे सहभागी झाले होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Maratha Reservation : “सरकारचा एकही निर्णय मान्य नाही, आंदोलकांना त्रास देऊ नका नाहीतर”…; जरांगे पाटलांचा इशारा

- Advertisment -

ताज्या बातम्या