Monday, June 24, 2024
HomeनाशिकVideo : मोहाडीत सामुहिक मुंडण करून सरकारचा निषेध

Video : मोहाडीत सामुहिक मुंडण करून सरकारचा निषेध

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

- Advertisement -

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर विविध आंदोलने सुरु असून त्यासाठी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरु केले आहे. आज गुरुवार दि.2 नोव्हेंबर रोजी मराठा आंदोलकांनी मुंडण करून मराठा आरक्षणासाठी रणशिंग फुंकलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

मोहाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कादवा कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी, मविप्र संचालक प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोहाडी येथे साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला सर्व पक्ष व जातीतून पाठिंबा मिळत आहे. मोहाडी येथील सकल मराठा समाज पक्षविरहीत एकवटला आहे. यावेळी रोज नव्या आणि कायदेशीर पध्दतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या