Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; मराठा समाजाला १० टक्के...

मोठी बातमी! मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळणार

मुंबई | Mumbai

मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण देण्यासाठी आज राज्य सरकारने एक दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र, त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक (State Cabinet Meeting) पार पडली असून मागासवर्ग आयोगाने (Commission for Backward Classes) राज्य सरकारला दिलेल्या अहवालाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. यात मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण (Reservation) देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे….

- Advertisement -

Nashik Crime News : स्वत:वर गोळी झाडून दुय्यम पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत (Education and Jobs) १० आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मराठा समाज हा राज्यभरात २८ टक्के असल्याचे न्या शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आढळून आले आहे. तसेच सुमारे ५२ टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती व गट आधीच राखीव प्रवर्गात आहे. त्यामुळे राज्यातील २८ टक्के असलेल्या अशा मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणे पूर्णपणे असामान्य ठरेल अशी माहिती आयोगाने अहवालात दिल्याचे बोलले जात आहे.

Nashik Crime News : खून झालेल्या ‘त्या’ युवकाची ओळख पटली

मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नेमकं काय?

महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचा अहवाल मागासवर्ग आयोगाने दिला आहे. तसेच ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक परिस्थिती असल्याचेही अहवालात म्हटले आहे. यासोबत मराठा समाज हा राज्यभरात २८ टक्के असून त्यांना इतर मागास प्रवर्गात ठेवणे पूर्णपणे असामान्य ठरेल, अशी माहिती देखील मागासवर्ग आयोगाने दिली आहे.

Nashik Crime News : एकलहरे परिसरात आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह

- Advertisment -

ताज्या बातम्या