Sunday, October 13, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Reservation : राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची घेणार भेट

Maratha Reservation : राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची घेणार भेट

मुंबई | Mumbai

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेले मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण त्यांनी मागे घ्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKnath Shinde) यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

- Advertisement -

कालपासून त्यांनी पाण्याचादेखील त्याग केला आहे. आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. जरांगे पाटील यांना राज्य सरकारचे शिष्टमंडळ कायदेशीर बाबी समजावून सांगणार आहेत. तसेच त्यांना उपोषण मागे घ्या, अशी विनंतीदेखील करणार आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर कायदेशीर बाबी पूर्ण करूनच न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. तसेच मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या