पुणे | Pune
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागात आंदोलक आक्रमक झाले आहे. बीड, धाराशिव , हिंगोली, छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आंदोनल हिंसक झाले आहे. या आंदोलनाचे लोण पुण्यात देखली पोहचले आहे. आज पुण्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे.
- Advertisement -
आंदोलकांनी पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ रस्ता अडवला आहे. मराठा आदोलकांकडून टायरची जाळपोळ करण्यात आली आहे. त्यामुळे नवे पुलाजवळील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा मराठा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहे. मुंबई आणि साताऱ्या कडे जाणारी वाहतूक आडवली आहे.