Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनयंदाचा 'विष्णुदास भावे पदक पुरस्कार २०२३' मराठी अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर

यंदाचा ‘विष्णुदास भावे पदक पुरस्कार २०२३’ मराठी अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर

मुंबई | Mumbai

मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damale) यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. दामले यांनी रंगभूमीवर विविध प्रयोग यशस्वी करुन दाखवले. यंदाचा मराठी रंगभूमीवरचा सर्वात मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पदक पुरस्कार (Vishnudas Bhave Puraskar) प्रशांत दामलेंना जाहीर झाला आहे.

- Advertisement -

अभिनेते आणि नाट्य निर्माते प्रशांत दामले यांनी रंगभूमीसाठी दिलेलं जे योगदान आहे त्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. गौरवपदक, २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

सरन्यायाधीशांनी समलिंगी विवाहाबाबतचा निर्णय संसदेवर सोपवला; सुप्रिम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

५ नोव्हेंबर या दिवशी म्हणजेच रंगभूमी दिनाच्या दिवशी हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी दिली. अखिल भारतीय महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर सांगली यांच्या वतीने मागच्या ५६ वर्षांपासून नाट्य क्षेत्रातील विविध कलाकारांना हा पुरस्कार दिला गेला आणि त्यांचा गौरव करण्यात आला.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मराठी नाट्यसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानंे प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून दामले यांच्याकडे पाहिले गेले आहे. दामले यांच्या अनेक नाटकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान प्रशांत यांच्या सध्या सुरू असणाऱ्या नाटकांबद्दल बोलायचे झाल्यास, प्रशांत दामले प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ हे नाटक प्रेक्षकांना नाट्यगृहांकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरते आहे. शिवाय त्यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चेही प्रयोग यशस्वीरित्या सुरू आहेत. मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही सदाबहार जोडी या नाटकात धमाल करताना पाहायला मिळते आहे.

राहुल नार्वेकर चोरांचे सरदार झालेय; संजय राऊतांचा हल्लाबोल

अखिल भारतीय नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई चे अध्यक्ष प्रशांत दामले हे सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत, मराठी चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता, रंगमंच अभिनेता, गायक, पार्श्वगायक, नाट्यनिर्माते आहेत. विनोदी अभिनयासाठी मराठी नाटक आणि चित्रपट जगतात ते परिचित आहेत. कलेच्या प्रवासात त्यांना अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या नावावर पाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आहेत.

दरम्यान, नाटकाशिवाय प्रशांत दामलेंनी ३७ मराठी चित्रपट आणि २४ दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये ‘आम्ही सारे खवय्ये’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांना २० पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कार’, ‘नाट्यदर्पण पुरस्कार’, ‘कलारंजन पुरस्कार’, ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विविध पुरस्कार यांचा यात समावेश आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या