Saturday, May 30, 2026
HomeमनोरंजनMarathi Actress Arrested : चित्रपटसृष्टीत खळबळ! १० कोटींच्या खंडणी प्रकरणी मराठी अभिनेत्रीला...

Marathi Actress Arrested : चित्रपटसृष्टीत खळबळ! १० कोटींच्या खंडणी प्रकरणी मराठी अभिनेत्रीला अटक; दीड कोटी घेताना रंगेहात पकडले

मुंबई । Mumbai

- Advertisement -

मराठी चित्रपटसृष्टीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गोरेगाव येथील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने एका अभिनेत्रीसह दोन महिलांना अटक केली आहे. या कारवाईमुळे सिनेविश्वात मोठी चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘गोयल अँड सन्स इन्फ्रा एलएलपी’ नावाचा व्यवसाय करणाऱ्या एका विकासकाने १४ नोव्हेंबर रोजी रात्री आंबोली येथील एका हॉटेलमध्ये मुलाच्या लग्नानिमित्त पार्टी आयोजित केली होती. १५ नोव्हेंबरच्या पहाटे, पार्टी संपवून व्यावसायिकेचा मुलगा, त्याची होणारी पत्नी आणि मित्र हॉटेलच्या लिफ्टने खाली उतरत होते. यावेळी एक महिला अचानक लिफ्टमध्ये शिरली. लिफ्टमध्ये लेझर लाइट लावण्यावरून त्या महिलेने जाणीवपूर्वक वाद उकरून काढला आणि तिथे हाणामारी झाली. यानंतर, संबंधित महिलेने बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर खोटे आरोप करत आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

ब्लॅकमेलिंग आणि खंडणीची मागणी तक्रार दाखल केल्यानंतर हेमलता पाटकर (३९) आणि अमरीना मॅथ्यू फर्नांडिस (३३) नावाच्या दोन महिलांनी बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या मुलाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. दाखल केलेली पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी त्यांनी सुरुवातीला १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. बराच वेळ चाललेल्या तडजोडीनंतर हा आकडा साडेपाच कोटी रुपयांवर निश्चित झाला.

पोलिसांचा सापळा आणि अटक वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून बांधकाम व्यावसायिकाने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने या तक्रारीची दखल घेत लोअर परळ परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, साडेपाच कोटींपैकी दीड कोटी रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना पोलिसांनी हेमलता पाटकर आणि अमरीना फर्नांडिस या दोघींना रंगेहात पकडले.

अभिनय क्षेत्रातील कनेक्शन अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी हेमलता पाटकर ही मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री आणि डान्सर म्हणून ओळखली जाते. तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे, छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मधील एका ज्येष्ठ अभिनेत्रीची ती सून असल्याची माहिती समोर येत आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...